शिक्षण झाले उच्च, निवडला व्यवसायाचा मार्ग
सायली आणि दिव्या या लहानपणापासूनच्या वर्गमैत्रिणी आहेत. त्यांचे शिक्षण उत्तम झाले असून, सायलीने फार्मसीमध्ये शिक्षण घेतले आहे, तर दिव्या कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. आजच्या काळात उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्यांची वानवा असताना, अनेक तरुण-तरुणींना संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत इतरांच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय या दोघींनी घेतला.
advertisement
Dhapate Recipe : नाश्त्याला काय? मराठवाडा स्टाईल दही-धपाटे बेस्ट पर्याय, पाहा अगदी सोपी रेसिपी
शून्यातून विश्व उभे केले
या दोघींच्या कुटुंबात कोणाचाही व्यवसायाचा वारसा नाही. व्यवसायाची कोणतीही पूर्वकल्पना किंवा अनुभव नसतानाही, सायली आणि दिव्या यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या या निर्णयामुळे आणि मेहनतीमुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबात एक चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट खाता येणाऱ्या सँडविच या पदार्थाची मागणी ओळखून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी करून दाखवला.
महिन्याला एक लाखांहून अधिक उत्पन्न
या दोन तरुणी आज त्यांच्या सँडविच पॉइंटमधून दर महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक उत्पन्न घेत आहेत. हे उत्पन्न त्यांना त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ देत आहे.
नोकरीपेक्षा उद्योजिका बनण्यावर भर
भविष्यात चांगली नोकरीची संधी मिळाली, तरीही आपला व्यवसाय पुढे वाढवून तो मोठा करण्याची त्यांची इच्छा आहे. आम्ही इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा, इतर लोकांना नोकरी देऊ, हे सायली आणि दिव्या या दोघी उद्योजिकांचे ध्येय आहे.
नाशिकच्या या दोन उच्चशिक्षित मैत्रिणींनी नोकरी देणारे बनण्याचे स्वप्न बाळगून, आजच्या तरुणांसमोर स्वयंरोजगाराचा एक प्रेरणादायी आणि यशस्वी मार्ग उभा केला आहे.