स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 6.80 टक्के, 2 वर्षांच्या एफडीवर 7.00 टक्के, 3 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के, 4 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज देत आहे. या सर्व एफडी स्कीम्सवर एसबीआय 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 0.50 अतिरिक्त व्याज देत आहे.
advertisement
RBIने 30,73,41,03,00,000 खर्च केले, पण कशासाठी? पत्रक काढून स्वत: दिली माहिती
पोस्ट ऑफिस
बँकांप्रमाणेच, पोस्ट ऑफिस देखील आपल्या ग्राहकांना एफडी अकाउंट उघडण्याची सुविधा प्रदान करते. पोस्ट ऑफिसमध्ये, एफडीला टाइम डिपॉझिट म्हणजेच टीडी म्हणून ओळखले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये किमान 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी टीडी करता येते. पोस्ट ऑफिस 1 वर्षाच्या टीडीवर 6.9 टक्के, 2 वर्षांच्या टीडीवर 7.0 टक्के, 3 वर्षांच्या टीडीवर 7.1 टक्के आणि 5 वर्षांच्या टीडीवर 7.5 टक्के व्याज देत आहे. बँकांप्रमाणे, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही अतिरिक्त व्याज देत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये सर्वांना समान व्याज दिले जाते.