TRENDING:

GSTच्या नव्या दराने किती फरक पडतोय किमतीत? बचत कॅल्क्युलेटर LIVE, खरेदीची बिले पाहून तुम्ही थक्क व्हाल

Last Updated:

New GST Rates: 22 सप्टेंबरपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू होणाऱ्या नव्या GST दरामुळे रोजच्या खरेदीत मोठी बचत होणार आहे. सरकारने savingswithgst.in ही खास वेबसाइट सुरू करून ग्राहकांना थेट त्यांची बचत तपासण्याची सुविधा दिली आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: देशात 22 सप्टेंबर रोजी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीचे (GST) नवे दर लागू होणार आहेत. या बदलामुळे रोजच्या खरेदीवर नेमकी किती बचत होईल, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सरकारने 'MyGov' हे व्यासपीठ पुढे आले आहे. 'MyGov' ने जाहीर केले आहे की, आता ग्राहक स्वतःच जीएसटी कपातीमुळे कोणत्या वस्तूंवर किती बचत होणार, हे तपासू शकतात. यासाठी savingswithgst.in ही खास वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

advertisement

बचत तपासण्यासाठी खास वेबसाइट

'MyGov' ने त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून म्हटले आहे की- "नेक्स्ट-जनरेशन जीएसटी आला आहे! पण तुम्ही किती बचत करू शकता याचा विचार करत आहात का?" या पोस्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, ग्राहक आता त्यांच्या खरेदीच्या वस्तूंना कार्टमध्ये जोडून किमतीमधील फरक स्वतःच तपासू शकतात.

advertisement

तुमची बचत कशी तपासाल?

ग्राहकांनी savingswithgst.in या वेबसाइटवर जा. तेथे तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू 'कार्ट'मध्ये जोडा. तुम्हाला तिथे तीन वेगवेगळ्या किमती दिसतील.

बेस प्राइस: वस्तूची मूळ किंमत.

वॅटच्या (VAT) अंतर्गत किंमत: जुन्या कर प्रणालीनुसार वस्तूची किंमत.

advertisement

नेक्स्ट-जनरेशन जीएसटीच्या अंतर्गत किंमत: नव्या जीएसटी दरानुसार वस्तूची किंमत.

यामुळे तुम्हाला लगेच कोणत्या वस्तूवर किती बचत होत आहे, हे कळेल.

'MyGov' ने सांगितले आहे की, तुम्ही क्यूआर कोड (QR code) स्कॅन करूनही या वेबसाइटवर जाऊ शकता.

advertisement

कोणत्या वस्तूंवर होणार बचत?

या वेबसाइटवर फूड, स्नॅक्स, घरगुती वस्तू, स्वयंपाकघरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि लाइफस्टाइल अशा विविध श्रेणी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ- 60 रुपये प्रति लिटर असलेल्या दुधाची किंमत पूर्वी वॅटसह 63.6 रुपये होती. पण आता नव्या जीएसटी दरानुसार ते 60 रुपयांनाच मिळेल. अशा प्रकारे अनेक वस्तूंवर बचत होणार आहे.

मराठी बातम्या/मनी/
GSTच्या नव्या दराने किती फरक पडतोय किमतीत? बचत कॅल्क्युलेटर LIVE, खरेदीची बिले पाहून तुम्ही थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल