TRENDING:

Share Market: किरकोळ गुंतवणूकदारांसाठी थेट जॅकपॉट,610 रुपयांचा शेअर बदलणार गेम; आज एक घ्या उद्या होतील 5

Last Updated:

Share Market: अदानी पॉवरने आपला पहिला स्टॉक स्प्लिट जाहीर केला आहे. कंपनीच्या 1 शेअरचे 5 शेअर्स होणार. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक शेअर्स, वाढलेली liquidity आणि नफा मिळण्याची संधी आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: देशातील प्रसिद्ध कंपनी अदानी पॉवरने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनीने आपल्या शेअर्सच्या स्प्लिटची (Stock Split) घोषणा केली. त्यांचा पहिला स्टॉक स्प्लिट 1:5 या प्रमाणात होईल. याचा अर्थ 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर आता दोन रुपये दर्शनी मूल्याच्या पाच शेअर्समध्ये रूपांतरित होईल. हा कंपनीचा पहिला मोठा कॉर्पोरेट निर्णय आहे. ज्यामुळे थेट गुंतवणूकदारांना फायदा होईल.

advertisement

अदानी पॉवरने एक्सचेंज फाइलिंगमध्ये स्क्रुटिनायझरचा अहवाल आणि पोस्टल बॅलेटचा निकाल सादर करत सांगितले की, या प्रस्तावाला मोठ्या संख्येने भागधारकांनी हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 1 ऑगस्ट 2025 रोजीच या स्टॉक स्प्लिटला मंजुरी दिली होती. त्याच दिवशी त्यांनी जून तिमाहीचे निकालही जाहीर केले होते.

advertisement

शेअर्सची संख्या वाढणार

स्टॉक स्प्लिटनंतर अदानी पॉवरच्या इक्विटी शेअर्सची संख्या 2480 कोटींवरून 12,400 कोटींवर जाईल. कंपनीने सुरुवातीला रेकॉर्ड डेट जाहीर केली नव्हती. पण आता ती 22 सप्टेंबर निश्चित केली आहे. याचा अर्थ त्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांकडे शेअर्स असतील त्यांनाच स्प्लिटचा फायदा मिळेल.

advertisement

शेअर बाजारातील कामगिरी

गेल्या शुक्रवारी अदानी पॉवरचा शेअर हिरव्या चिन्हावर बंद झाला. कंपनीचा शेअर 609.90 रुपयांवर उघडला. तर मागील दिवसाचा बंद भाव 608.50 रुपये होता. दिवसाच्या व्यापारात तो 601.८० रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला. पण अखेरीस 610.30 रुपयांवर बंद झाला म्हणजेच 0.26% ची वाढ नोंदवली.

advertisement

गुंतवणुकीवरील परतावा

गेल्या एका वर्षात अदानी पॉवरच्या शेअरने गुंतवणूकदारांना संमिश्र परतावा दिला आहे. या काळात शेअर 6% पेक्षा जास्त घसरला. 16 सप्टेंबर 2024 रोजी 681.30 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तर 21 नोव्हेंबर 2024 रोजी 430.85 रुपयांच्या नीचांकी पातळीवरही आला. मात्र 2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरने 15% परतावा दिला आहे. जो सेन्सेक्सच्या 2% वाढीपेक्षा कितीतरी जास्त आहे.

कंपनीची ओळख

13,650 मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेसह अदानी पॉवर ही भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनी देशातील अनेक राज्यांमध्ये कोळसा-आधारित आणि नवीकरणीय अशा दोन्ही प्रकारच्या प्रकल्पांवर काम करते. स्टॉक स्प्लिटनंतर, कंपनीला आशा आहे की शेअरची तरलता (लिक्विडिटी) वाढेल आणि अधिक किरकोळ गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतील.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
Share Market: किरकोळ गुंतवणूकदारांसाठी थेट जॅकपॉट,610 रुपयांचा शेअर बदलणार गेम; आज एक घ्या उद्या होतील 5
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल