शेअर मार्केटमध्ये वाढत जाणाऱ्या शेअर्सच्या किंमतींना अचानक ब्रेक लागला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही गडगडलं आहे. बाजार उघडल्यानंतर एकीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला, तर दुसरीकडे नॅशनल शेअर मार्केटच्या निफ्टीमध्येही 140 अंकांची घसरण झाली आहे.
शेअर मार्केट उघडताच टॉप-30 लार्ज-कॅप कंपन्यांपैकी 23 कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हावर ट्रेड करताना दिसत आहेत. ICICI बँक शेअरमध्ये ज्यांनी पैसे टाकले त्यांना सर्वात जास्त तोटा झाला आहे. 1.80 टक्क्यांच्या घसरणीसह 1283 रुपयांवर पोहोचला. ॲक्सिस बँकेचा शेअर 1.63 टक्क्यांनी घसरला, रिलायन्स शेअरचे शेअर्स देखील 1.81 टक्क्यांनी घसरले होते. टाटा मोटर्सचा शेअर 1.20 टक्क्यांनी घसरून 980 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
advertisement
स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही गोंधळ
BSE वर मिडकॅप रेंजमधील शेअर्स 146.85 अंकांनी घसरून 49,343 अंकांवर पोहोचले आहेत. फिनिक्स लिमिटेड शेअर 5.93 टक्क्यांनी घसरला, भारती हेक्साकॉम शेअर 3.46 टक्क्यांनी घसरला आहे. BHEL शेअर देखील वाईटरित्या घसरले आहेत. मॅक्सहेल्थ शेअर 2.48 टक्क्यांनी घसरून 970.65 रुपयांवर व्यवहार करत आहे.
दुसऱ्या सत्रात ही स्थिती सुधारणार की आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर मार्केटमधील ही घसरण सुरूच राहणार हे पाहावं लागणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. आता लोक सोन्याचे दर वाढत असल्याने तिथे गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. येत्या काळात शेअर मार्केटवर जिओ पॉलिटिक्सचा कसा परिणाम होतो ते पाहावं लागणार आहे.