बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.5 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.2 टक्के वाढ झाली. निफ्टीवर सर्वांत जास्त फायद्यात असलेल्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, विप्रो, टाटा मोटर्स आणि एसबीआय लाइफ यांचा समावेश होता. नुकसान झालेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, बीपीसीएल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि आयटीसी यांचा समावेश होता.
प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितलं, की बऱ्याच काळानंतर बुल्सनी आज आपल्या ताकदीची ओळख करून दिली आहे. इंडेक्सने आपली तेजी पुढे वाढवली आहे. मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या मजबूत कामगिरीमुळे आजच्या तेजीला सपोर्ट मिळाला. निफ्टीने 205.85 अंकांच्या तेजीसह 23,163.10वर कामकाज थांबवलं. FMCG वगळता अन्य सर्व सेक्टर्स हिरव्या रंगात बंद झाले आहेत. आयटी ही क्षेत्रं आज टॉप परफॉर्मरच्या रूपाने पुढे आली आहेत.
advertisement
RSIमध्ये पॉझिटिव्ह विचलन झाल्यामुळे चांगलं काम झालं. सध्या निफ्टी फॉलिंग वेज फॉर्मेशन ब्रेकआउटच्या काठावर उभा आहे. तो 23,200-23,250च्या झोनमध्ये गेल्यावर निफ्टीला 23,550पर्यंत घेऊन जाऊ शकतो. निफ्टीसाठी तत्काळ रेझिस्टन्स आणि सपोर्ट क्रमशः 23,270 आणि 23,000 वर स्थित आहे.
मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे यांनी सांगितलं, की अमेरिकी बाजारांमध्ये तेजी आणि युरोपीय इंडेक्समध्ये वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजाराच्या सेंटिमेंटला बूस्ट दिला. गुरुवारच्या मासिक एफ अँड ओ एक्स्पायरीच्या आधी झालेली दिलासादायक रॅली दुसऱ्या कामकाज सत्रातही कायम राहिली. कारण बाजार ओव्हरसोल्ड पोझिशनमध्ये होता. त्यामुळे नव्याने काही दिलाशाची अपेक्षा होती. अलीकडेच झालेल्या विक्रीनंतर आज मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी आली. असं असलं तरीही, आगामी काही दिवसांत बजेट सादर केलं जाणार आहे, तसंच एफआयआयची विक्री सातत्याने सुरू राहिल्यास बाजाराचा दृष्टिकोन सावधानतेचाच असेल.