TRENDING:

Share Market बंद होताच आली मोठी बातमी, शुक्रवारी बाजारात मोठा ट्विस्ट; Stocks to Watchची 10 शेअरची यादी

Last Updated:

Share Market Prediction: शुक्रवारी शेअर बाजारात मोठा थरार पाहायला मिळू शकतो. हिरो मोटोकॉर्प, एअरटेल, सिप्ला आणि प्रीमियर एनर्जीजसारख्या दिग्गज कंपन्यांच्या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि सस्पेन्स निर्माण झाला आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: गुरुवारी शेअर बाजारात सुरुवातीला चांगली तेजी दिसून आली होती. पण नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांकाने वाढ गमावली. तरीदेखील बाजार शेवटी हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी ठरला. आता गुंतवणूकदारांची नजर शुक्रवारच्या व्यवहारावर आहे. कारण शेवटच्या तासात झालेली विक्रीची लाट पुढेही सुरू राहते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यासोबतच बाजार बंद झाल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांच्या घोषणा झाल्या आहेत. ज्यामुळे शुक्रवारचा ट्रेडिंग सेशन तुफान रंगणार आहे.

advertisement

उद्या बाजारात Hero MotoCorp, Bharti Airtel, Balkrishna Industries, Premier Energies, AGI Infra, Cipla, Kaynes Technology, Sagar Cements, South India Paper Mills आणि Arko Noble या स्टॉक्सवर विशेष लक्ष केंद्रित राहणार आहे.

advertisement

Hero MotoCorp

देशातील अग्रगण्य दोनचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पने यूकेच्या MotoGB या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीतून हिरो आपले प्रीमियम मोटरसायकल मॉडेल्स ब्रिटनच्या बाजारात लॉन्च करणार आहे. या करारासह कंपनीने आपल्या विस्ताराचा नवा टप्पा गाठला असून, ती आता 51व्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करत आहे. हे हिरोच्या ग्लोबल स्ट्रॅटेजीमधील मोठं पाऊल मानलं जातं.

advertisement

Bharti Airtel

टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलने आपल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, तिच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार 3 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. या बैठकीत जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल सादर केले जातील.

advertisement

AGI Infra

रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातील कंपनी AGI Infra Ltd ने 500 कोटींपर्यंत निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी इक्विटी शेअर्स जारी करून (equity issue) गोळा करण्यात येणार आहे. कंपनीच्या विस्तार आणि नवीन प्रोजेक्ट्ससाठी ही रक्कम वापरली जाईल.

Premier Energies Ltd

प्रीमियर एनर्जीजने गुरुवारी जाहीर केलं की, कंपनीच्या बोर्डाने पुण्यातील KSolare Energy Pvt Ltd मधील 51% हिस्सेदारी खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. या व्यवहाराची एकूण किंमत 86.7 कोटी इतकी असेल. या अधिग्रहणासह कंपनी सोलर इनव्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तिचं नूतनीकरणक्षम ऊर्जेतील स्थान आणखी मजबूत होईल.

Balkrishna Industries

टायर निर्माता कंपनी बालकृष्ण इंडस्ट्रीज (BKT) च्या बोर्डाची बैठक शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. या बैठकीत तिमाही निकाल जाहीर करण्यासोबतच FY 2025-26 साठी दुसऱ्या इंटरिम डिव्हिडंडचा विचार केला जाईल. जर डिव्हिडंड जाहीर झाला, तर त्याची रेकॉर्ड डेट 6 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

Cipla Ltd

फार्मा क्षेत्रातील दिग्गज सिप्ला लिमिटेडने गुरुवारी मोठी घोषणा केली. कंपनीने Eli Lilly सोबत करार केला असून, भारतात Tirzepatide या औषधाचा दुसरा ब्रँडYurpeakलॉन्च करण्यासाठी मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्यूशन अॅग्रीमेंट साइन करण्यात आला आहे. हे औषध मधुमेह (Diabetes) आणि वजन नियंत्रण उपचारांसाठी वापरले जाणार आहे.

Kaynes Technology

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील कंपनी Kaynes Technologyची सहाय्यक कंपनी Kaynes Holdingने जर्मनीस्थित Sensonic GmbH या कंपनीतील 7% हिस्सेदारी खरेदीसाठी शेअर परचेस अॅग्रीमेंट साइन केले आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीला सेन्सर तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश मिळणार आहे.

Sagar Cements

सागर सिमेंट्सने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीला या तिमाहीत 42.17 कोटींचा तोटा झाला आहे, जो मागील वर्षाच्या 55.77 कोटींच्या तोट्यापेक्षा कमी आहे. कंपनीची आय 27% वाढून 602 कोटींवर पोहोचली आहे. EBITDA दुपटीहून अधिक वाढला असून, ऑपरेटिंग मार्जिनमध्येही सुधारणा दिसून आली आहे.

South India Paper Mills Ltd

पेपर उत्पादन क्षेत्रातील कंपनी साउथ इंडिया पेपर मिल्सने घाट्यातून नफा कमावण्यात यश मिळवलं आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 2.81 कोटींचा नफा झाला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 1.21 कोटींचा तोटा झाला होता. कंपनीची एकूण आय 101.77 कोटींवरून 111.56 कोटींवर पोहोचली आहे.

Arko Noble

कंपनी Arko Nobleने जाहीर केलं की तिला पश्चिम बंगाल GST विभागाकडून 63 लाख रुपयांचा कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) प्राप्त झाली आहे. कंपनीने म्हटलं आहे की ती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी आवश्यक स्पष्टीकरण देणार आहे.

मराठी बातम्या/मनी/
Share Market बंद होताच आली मोठी बातमी, शुक्रवारी बाजारात मोठा ट्विस्ट; Stocks to Watchची 10 शेअरची यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल