TRENDING:

Stock Market: शेअर नव्हे पैसे छापणारी मशीन; 1 लाखाचे झाले 1,04,32,000 रुपये- आजची एका Share किंमत फक्त 143 रुपये

Last Updated:

Share Market: फक्त 1 रुपयापासून सुरू झालेल्या एलिटकॉन इंटरनॅशनलने अवघ्या पाच वर्षांत 10,000% पेक्षा जास्त झेप घेत गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये थेट 1 कोटींवर पोहोचवले. एफएमसीजी क्षेत्रातील या छोट्या शेअरने कमाई, नफा आणि भाव वाढ तीनही स्तरांवर धमाका करत बाजारात खळबळ उडवली आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: शेअर बाजारात अनेक असे शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांसाठी अक्षरशःपैसे छापणारी मशीनबनत प्रचंड कमाई करून दिली आहे. काही शेअर्सनी दीर्घकालीन गुंतवणुकीत चमत्कारिक परतावा दिला, तर काहींनी अगदी कमी वेळात मल्टिबॅगर बनत गुंतवणूकदारांना करोडपती केले. अशाच शेअर्सपैकी एक म्हणजे एफएमसीजी कंपनी एलिटकॉन इंटरनॅशनल (Elitecon International). या स्टॉकने केवळ पाच वर्षांत 1 लाख रुपयांना 1 कोटी रुपयांहून अधिक मूल्य दिले आहे.

advertisement

एलिटकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये बुधवारी एक्स-डिव्हिडंड ट्रेड झाला. कंपनीने FY26 साठी 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 0.05 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला. किरकोळ म्हणून ओळखला जाणारा हा स्टॉक अल्पावधीतच गुंतवणूकदारांसाठीकोट्यधीशकरणारा शेअर ठरला आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या शेअरची किंमत सुमारे 1 रुपया होती, तो बुधवारी घसरणीनंतरही 143.35 रुपयांवर बंद झाला. गुरुवारी तो आणखी 2% पडत 130.80 रुपयांवर क्लोज झाला.

advertisement

गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने तब्बल 10,332% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. फक्त पाच वर्षेच नव्हे तर मागील एका वर्षात या शेअरने 2,554% रिटर्न, तर फक्त सहा महिन्यांत 287% परतावा देत गुंतवणूकदारांची गुंतवणूक तीनपट वाढवली आहे.

advertisement

बाजारातील सर्वसाधारण तेजी असूनही आठवड्याच्या चौथ्या दिवशी हा मल्टिबॅगर स्टॉक घसरत 139.80 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅपही घसरून 22,350 कोटी रुपयांवर आले.

या स्टॉकने गुंतवणूकदारांना कसे करोडपती केले याचे गणित पाहिले तर पाच वर्षांपूर्वी सुमारे 1 रुपयाच्या भावावर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते आणि तो गुंतवणूकदार शेअर होल्ड करून ठेवला असता, तर आज त्याची किंमत 1,04,32,000 रुपये झाली असती. म्हणजे पाच वर्षांत तो गुंतवणूकदार थेट करोडपती बनला असता.

advertisement

एलिटकॉन इंटरनॅशनल ही तंबाखू उत्पादने आणि एफएमसीजी वस्तूंच्या व्यवसायात कार्यरत कंपनी आहे. फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स क्षेत्रात कंपनीची उपस्थिती मोठ्या वेगाने वाढली आहे. 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट तब्बल 128% वार्षिक वाढत 8.84 कोटींवरून थेट 20.19 कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या इनकममध्येही पाच पट वाढ झाली आहे. कंपनीच्या व्यवसायातील या अभूतपूर्व वृद्धीमुळे तिच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संपत्ती झपाट्याने वाढत गेली आहे.

मराठी बातम्या/मनी/
Stock Market: शेअर नव्हे पैसे छापणारी मशीन; 1 लाखाचे झाले 1,04,32,000 रुपये- आजची एका Share किंमत फक्त 143 रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल