५ वर्षांचा वनवास संपला?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या ५ वर्षांपासून या शेअरने गुंतवणूकदारांना फक्त नेगेटिव्ह' रिटर्न्स दिले होते. ५ वर्षांत जी प्रगती झाली नाही, ती कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अवघ्या काही तासांत घडली आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत आणि याच तेलाच्या उसळीने या स्टॉकचं नशीब उजळलं आहे.
advertisement
का वाढतोय हा शेअर?
आकाश एक्सप्लोरेशन ही प्रामुख्याने तेल आणि गॅस उत्खनन क्षेत्रातील कंपनी आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की अशा सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होतो. विशेष म्हणजे, या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत ओएनजीसी, आयओसी, रिलायन्स आणि वेदांता सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. आज सकाळी हा शेअर १०.२० रुपयांवर उघडला आणि बघता बघता ११.७४ रुपयांच्या हाय लेव्हलवर पोहोचला.
महिन्याभरात ४५ टक्क्यांची झेप!
या शेअरमध्ये तेजीचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. ४ आणि ५ मार्चलाही या शेअरने २० टक्क्यांची भरारी घेतली होती. ६ मार्चला थोडी नफावसुली झाली असली, तरी आज पुन्हा एकदा या शेअरने 'रॉकेट' गती पकडली आहे. अवघ्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना ४५ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
हा एक पेनी स्टॉक असून याचे मार्केट कॅप ११६ कोटी रुपये आहे. कच्च्या तेलाच्या जागतिक परिस्थितीवर या शेअरची चाल अवलंबून आहे. त्यामुळे अशा छोट्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम ओळखूनच पाऊल उचलणे गरजेचे आहे.
डिस्क्लेमर- इथे दिलेली बातमी ही केवळ माहितीच्या उद्देशानं दिली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावी, कोणत्याही नफ्या तोट्याची जबाबदारी न्यूज18 घेत नाही.
