TRENDING:

दिवाळी-धनत्रयोदशी आधी बसला फटका, बाजारातून हे नाणी आणि नोटा झाल्या गायब, पण कारण काय?

Last Updated:

बाजारातून सुट्टे पैसे हळहळू कमी होत आहेत. 5 रुपए, 10 रुपयांचे नाणे बँकेतून मिळत नाही आहेत.

advertisement
दीपक पाण्डेय, प्रतिनिधी
संग्रहीत फोटो
संग्रहीत फोटो
advertisement

खरगोन, 25 ऑक्टोबर : सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. नवरात्री दसरा संपल्यानंतर आता दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीचा उत्साह सर्वांमध्ये पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या सणांत मोठी खरेदी केली जाते. प्रत्येक व्यक्ती दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी, कपडे इत्यादींसह काही किंवा इतर वस्तू खरेदी करते. त्यामुळे या माध्यमातून देशात सर्वात मोठा खरेदीचा व्यवसाय होतो.

advertisement

सध्या बाजारातही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सणासुदीच्या आधीच मधप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील बाजारात 5 रुपये, 10 रुपयांचे डॉलर आणि आणि नोटांचा तुटवडा वाढला आहे. रोख रक्कम नसल्याने दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना होत आहे.

बाजारातून गायब झाल्या 5 रुपयांच्या नोटा -

बाजारात खरेदी वाढल्याने व्यापारी आणि ग्राहकांना सुट्या पैशांची अडचण जाणवत आहे. 5 आणि 10 रुपयांची नाणी आणि नोटा राष्ट्रीयकृत बँकांमधून उपलब्ध होत नाही आहेत. बाजारात 5 रुपयांची नोट दिसणेही कठीण झाले आहे. यामुळे आता 5 रुपयांची नोट चलनातून बाहेर पडली आहे की काय असे लोकांना वाटू लागले आहे. त्यामुळेच दुकानदाराने नोट दिली तरी ग्राहक ती घेण्यास नकार देत आहेत. मात्र, आजही 5 रुपयांची नोट चलनात आहे. ती बाद झालेली नाही.

advertisement

दुकानदार पंकज जैन म्हणाले की, मागील 6 महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे. 5 रुपए, 10 रुपयांचे नाणे आणि नोटांचा तुटवडा जाणवत आहे. आधी बँकेची मदत व्हायची. मात्र, आता बँकेतही तुटवडा आहे. आमच्याकडे जे काही होते ते आम्ही ग्राहकांना दिले. आता जेव्हा एखादा ग्राहक वस्तू घेण्यासाठी येतो तेव्हा पैसे देताना सुट्टे पैसे नसतात.

advertisement

दुकानदार चैतन्य राठौड यांनी सांगितले की, बाजारातून सुट्टे पैसे हळहळू कमी होत आहेत. 5 रुपए, 10 रुपयांचे नाणे बँकेतून मिळत नाही आहेत. 10 रुपयांच्या नवीन नोटा मिळणेही बंद झाले आहे. बँकेत सुट्टे घ्यायला गेले तर फाटलेल्या, टेप लावलेल्या नोटा मिळतात. मात्र, ग्राहक या नोटा घेत नाही. अनेक ग्राहक सामान न घेताच परत जातो. अशाप्रकारे व्यवसायाला फटका बसत आहे.

advertisement

तर दुसरीकडे लोकल 18 ने स्टेट बँकेचे मॅनेजर सोनियत सिरके यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, समोरुनच बँकेत 5 रुपए, 10 रूपयांचे नाणे आणि नोटा येत नाही आहेत. या स्थितीमध्ये बँकेत जे चलन उपलब्ध आहे तेच देण्यात येत आहे. पण, 20, 50, 100 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा व्यापारी आणि बँक ग्राहकांना बँकांमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 5, 10 रुपयांची नाणी आणि नोटा आल्यावर लगेच देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या/मनी/
दिवाळी-धनत्रयोदशी आधी बसला फटका, बाजारातून हे नाणी आणि नोटा झाल्या गायब, पण कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल