TRENDING:

बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, पुण्यातील श्वेता यांचे लोणचे दुबईमध्ये एक्स्पोर्ट, होतीय बक्कळ कमाई

Last Updated:

पुण्यातील जेजुरी येथील सोनचाफा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत रोजगार निर्मिती करत आहेत. तर याच माध्यमातून विविध प्रकारची औषधी लोणची तयार करत असून प्रदर्शनामार्फत विक्री करण्याचे काम करत आहेत. 

advertisement
advertisement

पुणे : बचत गटाच्या माध्यमातून महिला ह्या वेगवेगळे व्यवसाय करत स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. पुण्यातील जेजुरी येथील सोनचाफा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत रोजगार निर्मिती करत आहेत. तर याच माध्यमातून विविध प्रकारची औषधी लोणची तयार करत असून प्रदर्शनामार्फत विक्री करण्याचे काम करत आहेत.

advertisement

सोनचाफा महिला बचत गटाची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली आहे. सोनचाफा महिला बचत गटामध्ये काम करत अनेक महिलांनी आपले वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. जेजुरी भागात वाड्या वस्तीवर राहणाऱ्या महिलांना काम नाही हे लक्षात आल्यानंतर प्रेरणा स्वयंरोजगार संस्था स्थापन करून महिलांना सरकारमार्फत वेगवेगळे कोर्स उपलब्ध करून देऊन यामधूनच लोणची तयार करण्याचे काम हे सुरू केले. यामध्येच श्वेता कटफळकर यांनी लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. 

advertisement

पुण्याच्या भीमथडी यात्रेत गुजराती हांडवो खाल्ला का? घरीच बनवू शकता स्पेशल रेसिपी

बेलफळ मुरांबा, बांबू मुरांबा, आवळ्याचा मुरांबा, ओली हळद लोणचे, खजूर लोणचे तयार केले जाते. यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर हा केला जात नाही. त्यामुळे याची मागणी ही वाढत आहे आणि विक्री ही फक्त प्रदर्शन मार्फतच केली जाते. ही लोणची आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी आहेत.

advertisement

60 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत याची विक्री ही केली जाते. यासोबत मसाले तयार करण्याचे काम ही आम्ही करतो. गेली 6 वर्ष झाली दुबईमध्ये देखील बांबू मुरांबा, बेलफळ, खडे मसाले हे एक्स्पोर्ट करत आहेत. तर ही लोणची आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे प्रदर्शनात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो, अशी माहिती सोनचाफा महिला बचत गटातील व्यवसायीका श्वेता कटफळकर यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, पुण्यातील श्वेता यांचे लोणचे दुबईमध्ये एक्स्पोर्ट, होतीय बक्कळ कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल