TRENDING:

Silver Price: एका झटक्यात चांदी १५००० रुपयांनी महागली, या कारणांनी वाढला भाव, आता पुढे काय?

Last Updated:

Silver Price Prediction: जागतिक बाजारपेठेतील अनपेक्षित घडामोडी आणि अमेरिकेच्या कमकुवत डॉलरचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला आहे.

advertisement
Silver Price Prediction: जागतिक बाजारपेठेतील अनपेक्षित घडामोडी आणि अमेरिकेच्या कमकुवत डॉलरचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला आहे. सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी देशांतर्गत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमतीत तब्बल ५.८२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. चांदीचे व्यवहार आज प्रति किलोग्रॅम २,६७,६७३ रुपये या उच्चांकी स्तरावर उघडले.
एका झटक्यात चांदी १५००० रुपयांनी महागली, 'या' कारणांनी वाढला भाव, आता पुढे काय?
एका झटक्यात चांदी १५००० रुपयांनी महागली, 'या' कारणांनी वाढला भाव, आता पुढे काय?
advertisement

आर्थिक तज्ज्ञांनुसार, सोनं-चांदीच्या दरात या आठवड्यातही तेजी राहण्याचा अंदाज आहे. गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित पर्यायांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

> चांदीच्या दरवाढीची कारणे काय?

चांदीच्या या विक्रमी तेजीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचं एक्सपर्ट सांगतात.

> अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले काही आयात शुल्क (Tariffs) रद्द केले आहेत. या निर्णयाकडे बाजारपेठेने आर्थिक वाढीसाठी सकारात्मक संकेत म्हणून पाहिले आहे.

advertisement

> डॉलरमध्ये घसरण: न्यायालयाच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर डॉलर कमकुवत झाला आहे. डॉलर स्वस्त झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने-चांदीची खरेदी परवडणारी ठरत आहे, परिणामी मागणी वाढून किमतींना आधार मिळाला.

> अमेरिकन जीडीपीमध्ये घट: चौथ्या तिमाहीत अमेरिकेचा आर्थिक विकास दर (GDP) अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच १.४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. १९७२ नंतर सरकारी खर्चात झालेली सर्वात मोठी घसरण अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

advertisement

> भू-राजकीय घडामोडी: इराणने अणुकार्यक्रमावरील वाटाघाटींमध्ये काही सवलती देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ट्रम्प यांनी व्यापार सुरक्षेसाठी जागतिक दर १५ टक्के राहतील असे संकेत दिल्याने व्यापार करारांबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

> गुंतवणूकदारांचे पुढील पाऊल काय?

बाजार आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (Fed) जानेवारी महिन्यातील बैठकीच्या 'मिनिट्स'ची आतुरतेने वाट पाहत आहे. या बैठकीच्या तपशिलातून भविष्यातील व्याजदर कपातीबाबत किंवा वाढीबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत व्याजदरांची दिशा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये अशीच चढ-उतार पाहायला मिळू शकते.

advertisement

> पुढं काय होणार?

जागतिक व्यापार धोरणे आणि मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी बाजारातील या तांत्रिक संकेतांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे एक्सपर्ट सांगतात.

मराठी बातम्या/मनी/
Silver Price: एका झटक्यात चांदी १५००० रुपयांनी महागली, या कारणांनी वाढला भाव, आता पुढे काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल