TRENDING:

चांदीत एक रुपयांची गुंतवणूक करू नका; एक्सपर्टने स्पष्ट सांगितले, मोठे करेक्शन होणार; जेवढे कमावले त्यापेक्षा दुप्पट गमवाल

Last Updated:

Silver Prices: चांदीने 100 डॉलरचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला असला, तरी जागतिक तज्ज्ञांनी या तेजीला 'सट्टेबाजीचा फुगा' म्हटले आहे. कोणत्याही क्षणी हा फुगा फुटून चांदीच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते, असा इशारा देत गुंतवणूकदारांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

advertisement
मुंबई: शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 100 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला, मात्र तज्ज्ञ या वाढीकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. अनेक एक्सपर्ट्सच्या मते ही तेजी मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजीवर आधारित असून, लवकरच भावात तीव्र घसरण (Correction) होण्याची शक्यता आहे. आज नाही तर उद्या, चांदीच्या किमती खाली येणारच, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
News18
News18
advertisement

खरी मागणी की सट्टेबाजीचा खेळ?

रॉयटर्सच्या अहवालानुसार, Bank of America चे स्ट्रॅटेजिस्ट मायकेल विडमर (Michael Widmer) यांनी चांदीच्या सध्याच्या किमतींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते सध्याचे दर मौलिकदृष्ट्या (Fundamentally) योग्य नाहीत. विडमर म्हणाले की, आमच्या अंदाजानुसार चांदीची योग्य किंमत सुमारे 60 डॉलर प्रति औंस असायला हवी.

औद्योगिक मागणीचा विचार करता, सोलर पॅनल क्षेत्रातून येणारी चांदीची मागणी 2025 मध्ये आपल्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेली आहे. मात्र वाढत्या किमतींमुळे आता औद्योगिक वापरावर दबाव येत आहे. त्यामुळे मागणी-पुरवठ्याची समीकरणे सध्या घसरणीच्या दिशेने झुकताना दिसत आहेत.

advertisement

तेजी मर्यादेपेक्षा जास्त

या अहवालात StoneX या संस्थेच्या विश्लेषक रोना ओ’कॉनेल (Rhona O’Connell) यांनी चांदीच्या सध्याच्या तेजीबाबत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. त्यांच्या मते, सध्या चांदी स्वतःहून वेग घेणाऱ्या सट्टेबाजीच्या लाटेत अडकली आहे.

भू-राजकीय तणावामुळे सोन्याला बळ मिळत असून, त्याचा अप्रत्यक्ष फायदा चांदीला होत आहे, कारण चांदीची प्रति युनिट किंमत अजूनही तुलनेने स्वस्त वाटते. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार या तेजीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे.

advertisement

मात्र ओ’कॉनेल यांचा इशारा स्पष्ट आहे की, ही तेजी धोक्याची घंटा वाजवत आहे. ज्या क्षणी या वाढीत तडे दिसू लागतील, त्या तड्यांचे रूपांतर मोठ्या घसरणीत होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाव पडण्याची तयारी ठेवली पाहिजे.

Gold-Silver Ratio देखील धोक्याचा संकेत

सोने आणि चांदीच्या किमतीतील फरक झपाट्याने कमी होत असल्याने तज्ज्ञ अधिकच सावध झाले आहेत. सध्या फक्त 50 औंस चांदीत 1 औंस सोने खरेदी करता येत आहे, तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण 105 औंस चांदी इतके होते. याचा अर्थ असा की अवघ्या काही महिन्यांत चांदीने सोन्याच्या तुलनेत प्रचंड वेगाने कामगिरी केली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, ही कामगिरी संतुलित नसून धोकादायक वेगाची आहे.

advertisement

पुरवठ्याची समस्या का निर्माण झाली आहे?

चांदीच्या पुरवठ्यातील तुटवड्याला अनेक कारणे आहेत. दरवर्षी सुमारे 20 टक्के चांदी रीसायकलिंगमधून मिळते, मात्र किंमती जास्त असतानाही हाय-ग्रेड रिफाइनिंग क्षमतेच्या कमतरतेमुळे ही चांदी वेगाने बाजारात येऊ शकत नाही. याशिवाय माइनिंग क्षेत्रालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सलग चांदीमध्ये सप्लाय डेफिसिट आहे आणि ही स्थिती 2026 पर्यंत कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

advertisement

पुढे काय होणार?

विश्लेषकांच्या मते, येत्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर Profit Booking होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम चांदीच्या किमतींवर दिसून येईल.

BNP Paribas चे सीनियर कमोडिटी स्ट्रॅटेजिस्ट डेव्हिड विल्सन (David Wilson) यांचे म्हणणे आहे की, नोव्हेंबरनंतर गुंतवणूकदारांच्या जोरावर चांदीत जी उसळी पाहायला मिळाली; त्यानंतर लवकरच मुनाफावसूली सुरू होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः जेव्हा फिजिकल मार्केटमधील दबाव हळूहळू कमी होत आहे.

Disclaimer: ही माहिती जागतिक तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. ही माहिती जागतिक तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

मराठी बातम्या/मनी/
चांदीत एक रुपयांची गुंतवणूक करू नका; एक्सपर्टने स्पष्ट सांगितले, मोठे करेक्शन होणार; जेवढे कमावले त्यापेक्षा दुप्पट गमवाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल