सोलापूर - माठातील पाण्याला एक प्रकारची वेगळी गोडी असल्याने अनेकजण माठातीलच पाणी पिणे पसंद करतात. या माठाला गरिबाचा फ्रीज म्हणून संबोधले जाते. सोलापूरच्या होटगी गावातील कुंभार गल्ली हे माठ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही 15 ते 20 कुटुंबातील 150 लोक पारंपरिक पद्धतीनं माठ बनवण्याचं काम करत आहेत. उमेश कुंभार यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर आपला पारंपरिक व्यवसाय सुरू केला. याबाबत त्यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिलीये.
advertisement
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गरिबांचा फ्रीज समाजाला जाणारा मातीचा माठ, रांजण बाजारात विक्रीला आले आहेत, शहरी भागात याची मागणी कमी झाली असली तर मात्र ग्रामीण भागात अजूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मातीच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी लाभदायी, थंड आणि चविष्ट असते. गेल्या दहा वर्षापासून उमेश कुंभार व त्यांचे सहकार्य मातीपासून माठ बनवण्याचा काम करत आहेत. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरिबांच्या आवाक्याबाहेर असते. तसेच मातीच्या माठातील पाण्याच्या गुणधर्मामुळे देखील मातीच्या माठांना मोठी मागणी असते.
Watermelon: रंगाला भुलाल तर आरोग्याला मुकाल, कलिंगड खरेदीपूर्वी लक्षात ठेवा 5 टिप्स
कसा बनतो माठ?
माठ बनवण्यासाठी लागणारी लालमाती पंढरपूर येथून आणली जाते. काळी व पांढरी माती येथेच मिळते. या तीन मातीचे मिश्रण करून त्यामध्ये भट्टीतील राख, लाकडी भुस्सा टाकून मिश्रण केले जाते. पायाने तुडवून एकजीव करून चाकावरती घेतात. माठ बनवण्यास जानेवारीपासून सुरुवात होते. मेपर्यंत माठ बनवले जातात. सोबत विक्रीही सुरू असते. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत एक लाख छोटे-मोठे माठ तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात, असं कुंभार सांगतात.
परराज्यातून मागणी
तीन किलो मातीच्या एका गोळ्यात 25 ते 30 लिटर पाण्याचा एक माठ तयार होतो. एक माठ तयार करण्यास जवळपास अर्धा तासाचा वेळ लागतो. भाजण्यासाठी भट्टीत जवळपास दहा तास ठेवावे लागतात. एका भट्टीत जवळपास 100 माठ भाजले जातात. मोठे 1 माठ 120 रुपये ते 210 रुपयांपर्यंत होलसेल दरात विक्री केली जाते. तर होटगी गावात तयार झालेले माठ विक्रीसाठी सोलापूरसह पंढरपूर, सांगली, कर्नाटक, हुबळी, धाराशिव, लातूर, इंदापूर, बागलकोट, विजापूर आदी ठिकाणी पाठविले जात आहे.