पेनुर गावात राहणाऱ्या शिवाजी गोडसे यांचे शिक्षण बीएड, डी.एड पर्यंत झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिवाजी यांनी नोकरीचा शोध घेतला पण कुठेही नोकरी मिळाली नाही. एका मित्राने त्यांना गुळाचा चहा विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा सल्ला दिला. सोलापूर-पंढरपूर महामार्गावरील पेनुर गावाजवळ दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी ‘आमदार गुळाचा चहा’ या नावाने चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
Job Opportunity: दहावी पास असाल तर थेट परदेशवारी, 1 लाख 30 हजार पगाराची नोकरी, इथं करा अर्ज!
सुरुवातीला अडचणी
सुरुवातीच्या 5 ते 6 महिने चहाचा व्यवसाय करत असताना खूप अडचणी आल्या. पण खचून न जाता शिवाजी यांनी तो व्यवसाय तसाच सुरू ठेवला. आज शिवाजी गोडसे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय उत्तम चालत असून दिवसाला जवळपास 400 कप चहा विक्री होत आहे. तर या व्यवसायातून ते महिन्याला एक लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
धाकट्या भावाला बनवलं पोलीस
उच्चशिक्षित तरुण शिवाजी गोडसे यांच्या धाकट्या भावाने पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. शिवाजी यांनी चहा विकून त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. धाकट्या भावाला भरतीसाठी महिन्याला 5 हजार रुपये देत होते. मागील वर्षी शिवाजी गोडसे यांच्या धाकट्या भावाची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाली असून एक वर्ष पूर्ण झाले आहे.
दरम्यान, नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी न लाजता स्वतःचा व्यवसाय करावा. आपण पाहिलेले व घरच्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण या मार्गाने देखील पूर्ण करता येईल, असा असा सल्ला शिवाजी गोडसे यांनी दिला आहे.