TRENDING:

सोलापुरातील डबेवाल्याची अनोखी कहाणी! 2 डब्यापासून केली सुरुवात आता 160 डबे, महिन्याला होतीय बक्कळ कमाई

Last Updated:

आज 160 डबे देण्याचा काम लक्ष्मण घोडसे करत आहेत. तर घरात तयार झालेले डबे पुरविण्याच्या व्यवसायातून ते महिन्याला 40 हजार रुपयेपर्यंत कमाई करत आहेत.

advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी 
advertisement

सोलापूर : धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेळेवर घरगुती जेवण मिळत नाही. हीच गरज ओळखून 1994 सालापासून लक्ष्मण घोडसे हे अनोखा व्यवसाय करत आहेत. घरात तयार झालेले डबे पुरविण्याचं काम ते करत आहे. सिंधी समाजातील एका व्यावसायिकापासून दोन डब्याची सुरुवात केली होती. तर आज 160 डबे देण्याचा काम लक्ष्मण घोडसे करत आहेत. तर घरात तयार झालेले डबे पुरविण्याच्या व्यवसायातून ते महिन्याला 40 हजार रुपयेपर्यंत कमाई करत आहेत.

advertisement

लक्ष्मण चांगदेव घोडसे रा. तळेहिप्परगा सोलापूर हे 1994 सालापासून सोलापूर शहरात डबे पुरविण्याचं काम करत आहेत. सुरुवातीला लक्ष्मण घोडसे यांनी 2 डब्ब्यापासून या व्यवसायाला सुरुवात केली होती. तेव्हा महिन्याला 30 रुपये मिळत होते. तर लक्ष्मण घोडसे आता महिन्याला एका डब्याला 300 रुपये घेत असून 160 डबे देण्याचा काम करत आहेत. तसेच लक्ष्मण घोडसे यांचा मुलगा महेश घोडसे हा देखील त्यांच्या सोबत डबे देण्याचा काम करत आहे.

advertisement

Ramadan: कुवेत अन् सौदी अरेबियाचे खजूर सोलापुरात, किती मिळतोय दर? का आहेत खास?

दररोज सोलापूर शहरातील नवीपेठ, रामलाल चौक, शिंदे चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, कुंभार वेस, समाचार चौक, अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि पंढरपूर मार्केट या भागांमध्ये जाऊन 160 डबे वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे काम लक्ष्मण घोडसे आणि त्यांचा मुलगा महेश घोडसे करत आहे. तर घरात तयार झालेले डब्बे देण्याच्या व्यवसायातून लक्ष्मण चांगदेव घोडसे हे महिन्याला 40 हजार रुपयांची कमाई करत आहेत.

advertisement

2 डबे पुरवण्यापासून ही सेवा सुरू केली. आज त्यांची 160 डब्यांपर्यंत मजल गेली आहे. त्यावेळी हा व्यवसाय केवळ काही मोजक्या ग्राहकांपुरता मर्यादित होता. मात्र, त्यांच्यातील चिकाटी आणि सेवाभाव यामुळे त्यांचा व्यवसाय वाढत गेला आहे. लक्ष्मण घोडसे हे आपला मुलगा महेश घोडसे यांच्यासोबत हे कार्य करीत आहेत.

मराठी बातम्या/मनी/
सोलापुरातील डबेवाल्याची अनोखी कहाणी! 2 डब्यापासून केली सुरुवात आता 160 डबे, महिन्याला होतीय बक्कळ कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल