Ramadan: कुवेत अन् सौदी अरेबियाचे खजूर सोलापुरात, किती मिळतोय दर? का आहेत खास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Ramadan 2025: रमजानच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सोलापुरात तब्बल 50 हून अधिक प्रकारचे खजूर उलब्ध आहेत.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - रमजानचे उपवास अंतिम टप्प्यात आहेत. उपवास करणाऱ्यांसाठी सोलापूर येथील विजापूर वेस बाजारात सौदी अरेबिया, इराक आणि इराणमधून खजुरांची आवक झाली आहे. तसेच विविध देशातून 50 पेक्षा जास्त प्रकारचे खजूर उपलब्ध झाले आहेत. यामध्ये 60 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत प्रतिकिलो खजूर इथं मिळतात. खजूरच्या दरासंदर्भात अधिक माहिती खजूर व्यापारी मिनाल कुरेशी यांनी लोकल18 सोबत बोलताना दिली आहे.
advertisement
इस्लाम धर्मात रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हा संपूर्ण महिना मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत उपवास करतात. रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते देखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात.
advertisement
50 हून अधिक प्रकारचे खजूर बाजारात
सोलापुरातील विजापूर वेस येथील बाजारात विविध देशांतून 50 पेक्षा जास्त प्रकारचे खजूर उपलब्ध झाले आहेत. यामध्ये 60 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत प्रतिकिलो खजूर उपलब्ध आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रमजान आल्याने खजुरला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामध्ये लाल खजूर आणि काळी खजूर उपलब्ध असून लाल खजूर साधारणतः 60 रुपये ते 100 रुपये प्रति किलो, तर काळी खजूर 100 रुपये ते 2 हजार रुपये प्रती किलो बाजारात उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुरांच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढ झाली. दिवसभरातून जवळपास 100 हून अधिक खजूर बॉक्स विकत असल्याची माहिती बाजारपेठेतील खजूर विक्रेत्यांनी दिली आहे.
advertisement
खजुराचे कोणते प्रकार उपलब्ध?
बाजारात अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, बुरारी, कलमी, मदिना, रुकसार, हसना, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन यासह 50 पेक्षा जास्त खजुरचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. दुबई, सौदी अरेबिया, इराण, मदीना, कुवेत यासह देश विदेशातून सोलापुरात विक्रीसाठी खजूर येत असल्याची माहिती खजूर व्यापारी मिनाल कुरेशी यांनी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 29, 2025 3:08 PM IST