advertisement

Weather Alert : महाराष्ट्राच्या वातावरणात बदल, आता अवकाळी पावसाचीही एंट्री, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात 27 जानेवारी रोजी विभागनिहाय हवामान कसं असेल.
1/7
राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून, तापमानात वाढ होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात 27 जानेवारी रोजी विभागनिहाय हवामान कसं असेल.

2/7
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई-ठाणे परिसरात सकाळी हलके धुके राहील. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होईल. कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान 18 ते 22 अंश राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. समुद्रकिनारी वारे मध्यम ते तीव्र वेगाने वाहतील.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत मुख्यतः कोरडे हवामान राहील. सकाळी थंडी जाणवेल, पण दुपारी उष्णता वाढेल. कमाल तापमान 29 ते 33 अंश आणि किमान 14 ते 18 अंश असेल.

4/7
नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागात सकाळी धुके आणि ढगाळ आकाश राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 28 ते 32 अंश, किमान 15 ते 19 अंश राहण्याची शक्यता आहे. तापमानात हळूहळू वाढ होत असून, थंडीचे प्रमाण कमी होईल.

5/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील. 27-28 जानेवारी दरम्यान मोजक्या ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 29 ते 31 अंश, किमान 16 ते 20 अंश एवढं राहील. सकाळी धुके राहील.

6/7
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात मुख्यतः कोरडे आणि ढगाळ हवामान. कमाल तापमान 30 ते 34 अंश, किमान 17 ते 21 अंश राहील. थंडी कमी होत असून, काही ठिकाणी हलक्या सरी शक्य आहेत. सकाळी धुके राहील.

7/7
एकंदरीत, 27 जानेवारी रोजी महाराष्ट्रात हिवाळ्याचा शेवटचा टप्पा जाणवेल, पण थंडी कमी होत असल्याने दिवस उष्ण राहतील.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement