advertisement

Cooking Oil : घरात महिन्याला किती तेल वापरायला हवं? हे' गणित चुकलं तर आरोग्य धोक्यात, एक्सपर्ट्सचा इशारा

Last Updated:
Cooking Oil Right Uses : अन्नाची चव वाढवणारे हेच तेल जर मर्यादेबाहेर गेले, तर ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकतं. खासकरून घरातील गृहिणींनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, निरोगी आरोग्यासाठी तेलाचं नेमकं प्रमाण किती असावं?
1/9
भारतीय स्वयंपाकघर म्हटलं की खमंग फोडणीचा आवाज आणि मसाल्यांचा सुवास हा येतोच. भाजी असो, आमटी किंवा चमचमीत रस्सा; तेलाशिवाय या पदार्थांना चवच येत नाही. डोसा, चपातीपासून ते अगदी सणासुदीच्या तळलेल्या पक्वान्नांपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपण चमचमीच भाजी बनवायची म्हणून काहीही विचार न करता जास्तीचं तेल टाकतो. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की, चवीच्या नादात तुमच्या शरीरात दररोज किती तेल जात आहे?

2/9
 "अति तिथे माती" ही म्हण तेलाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अन्नाची चव वाढवणारे हेच तेल जर मर्यादेबाहेर गेले, तर ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकतं. खासकरून घरातील गृहिणींनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, निरोगी आरोग्यासाठी तेलाचं नेमकं प्रमाण किती असावं?

3/9
तेल जास्त झालं तर काय होतं?तेलाचा अतिवापर केवळ वजन वाढवत नाही, तर तो गंभीर आजारांना आमंत्रण देतो. शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' वाढण्यास तेल कारणीभूत ठरते. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये हे कोलेस्ट्रॉल जमा होते, तेव्हा हृदयविकाराचा (Heart Attack) धोका अनेक पटींनी वाढतो. याशिवाय उच्च रक्तदाब (High BP) आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांसाठी अति तेल म्हणजे संकटच.

4/9
एका व्यक्तीला महिन्याला किती तेल लागते?डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ व्यक्तीने संपूर्ण महिन्यात जास्तीत जास्त अर्धा लिटर (500 मि.ली.) तेल वापरणे पुरेसे आहे.
दिवसाला 2 ते 3 चमच्यांपेक्षा जास्त तेल पोटात जाता कामा नये.
एका व्यक्तीला महिन्याला किती तेल लागते?डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ व्यक्तीने संपूर्ण महिन्यात जास्तीत जास्त अर्धा लिटर (500 मि.ली.) तेल वापरणे पुरेसे आहे.दिवसाला 2 ते 3 चमच्यांपेक्षा जास्त तेल पोटात जाता कामा नये.
advertisement
5/9
4 जणांच्या कुटुंबासाठी किती तेल विकत घ्यावे?जर तुमच्या कुटुंबात 4 सदस्य असतील, तर एका महिन्यात तुमच्याकडे जास्तीत जास्त 2 लिटर तेल खर्च व्हायला हवे. अनेक घरांमध्ये एका महिन्यात 5 ते 10 लिटर तेलाचा डबा रिकामा होतो, जे अत्यंत धोकादायक आहे. तुमच्या कुटुंबाने '2 लिटर प्रति महिना' हे उद्दिष्ट ठेवले, तर तुम्ही भविष्यातील अनेक आजार टाळू शकता.

6/9
काही लोकांना दररोज तळलेले पदार्थ (भजी, वडे, पुरी) खाण्याची सवय असते. जर तुम्हाला तुमचे हृदय सुरक्षित ठेवायचे असेल, तर ही सवय आजच बदला. लहान मुले आणि वृद्ध यांच्या आहारात तेलाचा वापर अत्यंत मर्यादित ठेवावा.सूर्यफूल तेल, तीळ तेल, शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप; तुम्ही काहीही वापरत असलात तरी 'प्रमाण' महत्त्वाचे आहे. कोणतंही तेल जर मर्यादेबाहेर वापरलं तर त्याचे फायदे संपतात आणि तोटा सुरू होतो.

7/9
कमी तेलात स्वयंपाक करण्याच्या सोप्या टिप्स:1. नॉन-स्टिक पॅन: कमी तेलात स्वयंपाक करण्यासाठी नॉन-स्टिक भांडी वापरा.
2. वाफवलेले पदार्थ: तळण्यापेक्षा पदार्थ वाफवून (Steaming) खाण्यावर भर द्या.
3. मोजून तेल वापरा: फोडणी देताना थेट डब्यातून तेल न ओतता चमच्याने मोजून टाका.
4. तेल गरम झाल्यावरच फोडणी द्या: तेल व्यवस्थित गरम झाले की पदार्थ कमी तेल शोषतात.
कमी तेलात स्वयंपाक करण्याच्या सोप्या टिप्स:1. नॉन-स्टिक पॅन: कमी तेलात स्वयंपाक करण्यासाठी नॉन-स्टिक भांडी वापरा.2. वाफवलेले पदार्थ: तळण्यापेक्षा पदार्थ वाफवून (Steaming) खाण्यावर भर द्या.3. मोजून तेल वापरा: फोडणी देताना थेट डब्यातून तेल न ओतता चमच्याने मोजून टाका.4. तेल गरम झाल्यावरच फोडणी द्या: तेल व्यवस्थित गरम झाले की पदार्थ कमी तेल शोषतात.
advertisement
8/9
निरोगी जीवन जगण्यासाठी तेल किंवा तूप पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची. लक्षात ठेवा, चव जिभेपुरती असते, पण आरोग्य आयुष्यभरासाठी.

9/9
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement