सुजय पाचंगे यांनी सांगितले की, त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना, 25 फेब्रुवारी 2009 रोजी त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचे दोन्ही हात आणि पाय पूर्णपणे निकामी झाले. चार वर्षे ते फक्त बेडवर राहावे लागले. फक्त बोलू शकत होते. अजूनही त्यांना हातापायाची हालचाल करता येत नाही. या काळात त्यांना सुरुवातीला काय करावे हे कळत नव्हते आणि मानसिक संघर्षही मोठ्या प्रमाणात करावा लागला. परंतु त्यांच्या आई-वडिल आणि चुलत बहिणीच्या सततच्या पाठिंब्यामुळे त्यांनी डिप्रेशनवर मात केली आणि जीवनात पुढे जाण्याचा निर्धार केला.
advertisement
हाताने घडवलेली सुंदर कलाकृती, 4 लाखांचं पामलेप, पुण्यातील हस्तकला प्रदर्शनाचा खास Video
व्हीलचेअरवर असतानाही उभी केली 20 कोटींची कंपनी
अपघातानंतर सुजय पाचंगे यांनी 2014 मध्ये आपल्या बहिणीच्या मदतीने छोटा प्री-प्रायमरी स्कूल सुरू केला. काही अडचणीमुळे त्या कामातून त्यांना ब्रेक घ्यावा लागला. काही कालावधीनंतर त्यांनी 2016 साली त्यांनी वरद ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना केली. या कंपनीत मॅनपॉवर सर्विसेस सुरू करण्यात आल्या, ज्या कंपन्यांना कामगारांची गरज असते, त्यांना आवश्यक माणसं पुरवतात. आज ही कंपनी अनेक कंपन्यांसाठी कामगार पुरवण्याचे विश्वासार्ह माध्यम बनली आहे आणि कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 20 कोटींपर्यंत पोहोचला आहे.