हाताने घडवलेली सुंदर कलाकृती, 4 लाखांचं पामलेप, पुण्यातील हस्तकला प्रदर्शनाचा खास Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
या प्रदर्शनात मांडण्यात आलेलं चार लाख रुपये किमतीचं पामलेप पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
पुणे : आजकाल डिजिटलचा जमाना आहे. पण जेव्हा पेन आणि पेपरसुद्धा नव्हते, तेव्हा लोक कसं लिहायचे, याची झलक सध्या पुण्यातील कलाग्राम येथे भरलेल्या हस्तकला प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेलं चार लाख रुपये किमतीचं पामलेप पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या पामलेपविषयी अधिक माहिती चित्ररंजन स्वाही यांनी लोकल 18 ला दिली आहे.
चित्ररंजन स्वाही यांनी सांगितलं की हे पामलेप पूर्णपणे हाताने बनवलं जातं. यात कुठल्याही आधुनिक मशीनचा वापर केला जात नाही. पानावर अक्षरं आणि चित्रं कोरून लिहिली जातात. ही पाने वाळवून, पॉलिश करून आणि त्यानंतर विशेष द्रव्याचा वापर केला जातो जेणेकरून ती अनेक वर्ष टिकतात. ही प्रक्रिया अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक हातानेच केली जाते. यामध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा वापर केला जात नाही.
advertisement
त्यांनी या प्रदर्शनात मांडलेलं हे 4 लाख रुपये किमतीचं पामलेप चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे चित्र पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करत आहेत. या चित्रांमध्ये रामायण, कृष्णलीला, गणेश कथा अशा अनेक धार्मिक आणि पारंपरिक गोष्टी कोरल्या आहेत. हे चित्र तयार करण्यासाठी त्यांना जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला, या ठिकाणी 300 रुपयांपासून ते 4 लाखांपर्यंतच्या विविध पामलेप चित्रांचा संग्रह पाहायला मिळतो. प्रत्येक चित्रात एक वेगळी कथा, परंपरा आणि कलात्मकता दिसून येते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 06, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हाताने घडवलेली सुंदर कलाकृती, 4 लाखांचं पामलेप, पुण्यातील हस्तकला प्रदर्शनाचा खास Video

