Gold : सोन्याची शुद्धता घरच्या घरी कशी तपासावी? 'या' 5 पद्धतीने मशीनशिवाय ओळखा सोनं खरं की खोटं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
check gold purity at home :
भारतात सोनं हे केवळ एक मौल्यवान धातू नाही, तर ते आपल्या समृद्धीचं आणि परंपरेचं प्रतीक आहे. लग्नसमारंभ असो, दिवाळीची पाडवा असो किंवा अक्षय्य तृतीया, सोन्याची खरेदी हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकजण आपल्या कष्टाची कमाई सोन्यात गुंतवतात जेणेकरून भविष्यात ती कामाला येईल. मात्र, इतकी मोठी गुंतवणूक करताना अनेकदा लोकांच्या मनात नेहमी एक शंका असते "हे सोनं खरंच शुद्ध आहे का?"
advertisement
advertisement
1. हॉलमार्क चिन्हाची तपासणीसर्वात आधी भिंगाच्या (Magnifying Glass) साहाय्याने दागिन्यांवर बारकाईने नजर टाका. भारतीय मानकांनुसार (BIS), खऱ्या सोन्यावर 'BIS Hallmark' चा त्रिकोणी शिक्का, सोन्याची शुद्धता (उदा. 22K916) आणि ज्वेलर्सचा कोड असतो. जर दागिन्यावर असं कोणतंही चिन्ह नसेल, तर त्याच्या शुद्धतेवर शंका घेण्यास वाव आहे.
advertisement
2. पाण्याचे वजन तपासा (Float Test)सोनं हा एक अत्यंत जड आणि घन (Dense) धातू आहे. एका काचेच्या पेल्यात पाणी भरा आणि त्यात तुमचं सोन्याचं नाणं किंवा दागिना टाका. जर सोनं अस्सल असेल, तर ते थेट तळाला जाऊन बसेल. मात्र, जर ते पाण्यावर तरंगत असेल किंवा तळाला न जाता मध्येच राहत असेल, तर समजून जा की ते बनावट आहे किंवा त्यात हलक्या धातूंची भेसळ आहे.
advertisement
3. चुंबक चाचणी (Magnet Test)सोनं हा चुंबकीय धातू नाही, म्हणजेच ते चुंबकाकडे आकर्षित होत नाही. घरामध्ये असलेल्या एखाद्या शक्तिशाली चुंबकाजवळ तुमचा दागिना न्या. जर तो दागिना चुंबकाला चिकटला, तर याचा अर्थ त्यात लोखंड, निकेल किंवा इतर चुंबकीय धातू मिसळले आहेत. लक्षात ठेवा, 10/20 रुपयांच्या साध्या चुंबकाने ही चाचणी अचूक होणार नाही.
advertisement
advertisement
advertisement









