advertisement

21.8 KM मायलेज, सनरुफसह 6 एयरबॅग! या SUV च्या जोरावर मार्केटमध्ये राज्य करतेय Hyundai

Last Updated:

Hyundai Creta जानेवारी 2026 मध्ये कंपनीची Best Selling Car म्हणून समोर आली आहे. कंपनीने ही केवळ 10.79 लाख रुपयांच्या सुरुवाती एक्स शोरुम किंमतीत विकते. याचे फीचर्स लिस्टमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरुफ, 10.25-इंच टचस्क्रीन आणि बोस साउंड सिस्टम, ADAS, वायरलेस चार्जिंग, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी आणि सेफ्टीसाठी 6 एयरबॅग्स ESC आणि ABS चा समावेश आहे.

ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
मुंबई : Hyundai Creta जानेवारी 2026 मध्ये कंपनीची Best Selling Car म्हणून समोर आली आहे. कंपनीने ही केवळ 10.79 लाख रुपयांच्या सुरुवाती एक्स शोरुम किंमतीत विकते. याचे फीचर्स लिस्टमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरुफ, 10.25-इंच टचस्क्रीन आणि बोस साउंड सिस्टम, ADAS, वायरलेस चार्जिंग, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी आणि सेफ्टीसाठी 6 एयरबॅग्स ESC आणि ABS चा समावेश आहे.
Hyundai इंडियन मार्केटची सर्वात प्रसिद्ध कार कंपन्यांमधून एक आहे. गेल्या महिन्यातही या कंपनीचा चांगला सेल झाला होता. कंपनीने जानेवारी 2026 मध्ये एकूण 59,107 गाड्या विकल्या आहेत. जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या एकूण 54,003 युनिट्सच्या तुलनेत ही आकडेवारी वार्षिक आधारावर 9.45 टक्के वाढ दर्शवते.
सेल्स रिपोर्टवर नजर टाकली तर Hyundai Creta कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही आहे. तर Venue आणि Aura च्या सेलमध्येही वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त Exter आणि Alcazar चा सेलही कमी झाला आहे. चला कंपनीची Model Wise Sales Report वर एक नजर टाकूया.
advertisement
Hyundai Creta/EV
नमूद केल्याप्रमाणे, क्रेटा या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. गेल्या महिन्यात तिने 17,921 नवीन ग्राहक जोडले. जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 18,522 युनिट्सच्या तुलनेत ही आकडेवारी वर्षानुवर्षे 3 टक्के घट दर्शवते.
ह्युंदाई क्रेटाची किंमत 10.79 लाख ते 20.20 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. आतील भाग प्रशस्त आहे, त्यात व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन आणि बोस साउंड सिस्टम आहे. फीचर्समध्ये ADAS, वायरलेस चार्जिंग, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा फीचर्समध्ये सहा एअरबॅग्ज, ESC आणि ABS यांचा समावेश आहे. इंजिन ऑप्शनमध्ये 1.5 लिटर पेट्रोल (113 bhp, 17.4 kmpl), 1.5L डिझेल (114 bhp, 21.8 kmpl) आणि 1.5L टर्बो पेट्रोलचा समावेश आहे. दावा केलेला कमाल मायलेज 21.8 KMPL आहे.
advertisement
Hyundai Venue
सेलच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर वेन्यू आहे. या लहान एसयूव्हीला मागच्या महिन्यात 12,413 लोकांनी खरेदी केले. हा आकडा जानेवारी 2025 मध्ये सेल केलेल्या या कारच्या एकूण 11,106 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर 11 टक्केची वाढ दर्शवतो.
Hyundai Aura
या लिस्टमध्ये ऑरा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2026 मध्ये एकूण 7978 युनिट्स विकल्या गेल्या. जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 5388 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा 48 टक्के लक्षणीय वाढ दर्शवतो.
advertisement
Hyundai Grand i10
लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर ग्रँड आय 10 आहे. ही मागच्या महिन्यात 7710 लोकांनी खरेदी केली. जानेवारी 2025 मध्ये विकल्या गेलेल्या एकूण 5311 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा वार्षिक वाढीमध्ये 45 टक्के उल्लेखनीय वाढ दर्शवतो.
Hyundai i20
सेल वाढवण्यासाठी हुंडई आय 20 ने टॉप-5 कारच्या लिस्टमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.गेल्या महिन्यात 5677 नवीन ग्राहक मिळाले आहेत. हा आकडा जानेवारी 2025 मध्ये सेल केलेल्या आय 20 च्या एकूण 4741 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर आलेली 19.74 टक्के वाढ दर्शवतो. वर उल्लेख केलेल्या कंपनीच्या टॉप पाच कार व्यतिरिक्त, गेल्या महिन्यात ह्युंदाई एक्स्टरच्या 5621 युनिट्स, Alcazarच्या 962 युनिट्स, Vernaच्या 823 युनिट्स आणि Ioniqच्या फक्त एका युनिटची विक्री झाली. दरम्यान, Hyundai Tucsonला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
21.8 KM मायलेज, सनरुफसह 6 एयरबॅग! या SUV च्या जोरावर मार्केटमध्ये राज्य करतेय Hyundai
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement