लाडक्या बहिणींची झोप उडाली, या महिलांची नाव अर्जातून कायमची बाद, तुमच्याकडे उरले फक्त काही तास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची आज शेवटची तारीख असून, हजारो महिलांनी केंद्रांवर गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे चिंता आणि गोंधळ वाढला आहे.
advertisement
advertisement
योजना सुरू झाली तेव्हा निवडणुकीच्या धावपळीत पात्रतेच्या अटींची कडक तपासणी होऊ शकली नव्हती. याचा फायदा घेत अनेक अपात्र व्यक्तींनीही या योजनेत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, काही सरकारी कर्मचारी, पुरुष आणि आर्थिकदृष्ट्या सधन व्यक्तीही या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.
advertisement
या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येत आहे. हाच गैरप्रकार रोखण्यासाठी आणि केवळ खऱ्या गरजू महिलांनाच पैसा मिळावा, यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच सुविधा केंद्रांवर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक महिला पहाटेपासूनच रांगेत उभ्या आहेत. मात्र, एकाच वेळी हजारो महिलांनी पोर्टलचा वापर केल्यामुळे सरकारी सर्व्हरवर प्रचंड ताण आला असून प्रणाली संथ गतीने चालत आहे.
advertisement
काही ठिकाणी तर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे केंद्रांवरील मशीन बंद पडल्या, ज्यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागला. तासनतास रांगेत उभं राहूनही काम होत नसल्याने अनेक ठिकाणी संताप आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही तांत्रिक अडचणी आणि माहितीच्या अभावामुळे अनेक महिलांची केवायसी अद्याप प्रलंबित आहे.
advertisement
advertisement










