1100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, तरीही 'धुरंधर'ला मोठा लॉस! 10 मिलियन डॉलर्सवर सोडावं लागलं पाणी, नेमकं काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar Movie: 'धुरंधर' या चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा आकडा पार करून नवा इतिहास रचला आहे. पण असं असलं तरीही, या चित्रपटाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
advertisement
advertisement
advertisement
कपाडिया म्हणतात, "आम्ही किमान १० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सोसले आहे. आखाती देशांमध्ये भारतीय ॲक्शन सिनेमांची क्रेझ प्रचंड असते. 'फायटर' चित्रपटाच्या वेळीही असाच अनुभव आला होता. प्रत्येक देशाचे आपले नियम असतात आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे, पण एका मोठ्या प्रेक्षकवर्गाला चित्रपट पाहता आला नाही, याची खंत वाटते."
advertisement
advertisement
advertisement
आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागांत विभागलेला एक हाय-व्होल्टेज स्पाय ॲक्शन ड्रामा आहे. कराचीतील लियारी भागातील पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. त्याला साथ देण्यासाठी अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज मैदानात उतरली आहे. सध्या या चित्रपटाने जगभरात ११०० कोटींची कमाई केली आहे.
advertisement









