TRENDING:

व्यवसाय सुरु करण्यासाठी नव्हते पैसे, 5 हजार रुपये घेतलं कर्ज, वर्षांकाठी कोटींची उलाढाल करण्याऱ्या सुरेश यांची कहाणी

Last Updated:

कोकण म्हटलं की कोकणातील काजू, आंबा, कोकम हा कोकणी मेवा प्रसिद्ध आहे. काजू आणि कोकमावर आधारित उद्योग सुरेश नेरुळकर यांनी सुरु केला असून ते या उद्योगामार्फत कोटींची कमाई करतात. 

advertisement
सितराज परब, प्रतिनिधी
advertisement

सिंधुदुर्ग : कोकण म्हटलं की कोकणातील काजू, आंबा, कोकम हा कोकणी मेवा प्रसिद्ध आहे. कोकणात काजू, आंबा, कोकम यावर आधारित अनेक बागायती आपल्याला पाहायला मिळतात. गावोगावी आंबा, काजूची झाड ही असतातच. त्यामुळे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग देखील कोकणात भरपूर आहेत. असाच एक काजू आणि कोकमावर आधारित उद्योग सुरेश नेरुळकर यांनी सुरु केला असून ते या उद्योगामार्फत कोटींची कमाई करतात.

advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील व्यावसायिक सुरेश नेरुळकर यांनी एक 30 वर्षांपूर्वी काजू कारखाना उभारला आहे.  या उद्योगाविषयी सांगताना सुरेश नेरुळकर सांगतात की, 30 वर्षांपूर्वी 100 किलोच्या युनिटने हा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे देखील नव्हते मग बँकेकडून 5 हजार रुपये कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी 35 किलो काजू दिवसाला फोडून हा व्यवसाय कुटुंबा समवेत सुरु केला. नंतर तो वाढवत वाढवत बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन हा व्यवसाय वाढवला.

advertisement

नोकरी न करता शेती करायचं ठरवलं, पारंपारिक पद्धतीला दिला फाटा, 6 महिन्यात कमावला 11 लाख नफा

आज आपल्या कारखान्यात 125 मजूर काम करतात तसेच दिवसाला तीन ते चार टन काजू बी फोडली जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल हा स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतो. शेतकऱ्यांना देखील बाजार भावा पेक्षा तीन ते पाच रुपये किलोला जास्त हमी भाव देऊन हा माल खरेदी करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होतो, असं सुरेश नेरुळकर सांगतात.

advertisement

तसेच तयार झालेला काजूगर हा स्थानिक तसेच गोवा राज्य, तसेच परदेशातही पाठवला जातो. यातून वर्षांकाठी 9 ते 10 कोटींची  उलाढाल होते. येथील काजूला जी आय नामांकन असल्याने परदेशातही मोठी मागणी असते. माझ्या व्यसायामुळे 125 जणांचा  उदरनिर्वाह होतो याच एक समाधान मिळत, असंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/मनी/
व्यवसाय सुरु करण्यासाठी नव्हते पैसे, 5 हजार रुपये घेतलं कर्ज, वर्षांकाठी कोटींची उलाढाल करण्याऱ्या सुरेश यांची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल