नोकरी न करता शेती करायचं ठरवलं, पारंपारिक पद्धतीला दिला फाटा, 6 महिन्यात कमावला 11 लाख नफा

Last Updated:

सध्याला शेतकऱ्यांचा कल हा पारंपारिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करण्यावरती आहे. अशीच शेती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संतोष नागरे यांनी केलेली आहे.

+
तरूण

तरूण शेतकरी अद्रक शेतीतून कमवत आहे चांगलं उत्पन्न

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : भारत कृषीप्रधान देश आहे. सध्याला शेतकऱ्यांचा कल हा पारंपारिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करण्यावरती आहे. ज्यामध्ये फळबागा किंवा इतरही चांगली पिक घेऊन शेतकरी चांगली कमाई करत आहेत. अशीच शेती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संतोष नागरे यांनी केलेली आहे. त्यांनी अद्रक पिकांची लागवड करत लाखोंची कमाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या ठिकाणी संतोष नागरे राहतात. संतोष यांचे आई-वडील शेतीच करायचे. पण त्यांचे आई-वडील हे पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. त्यामध्ये ते कापूस, सोयाबीन किंवा गहू अशा पद्धतीचे पिके घ्यायचे. पण त्यामधून पाहिजे तसं उत्पन्न मिळत नव्हतं. संतोष यांनी बीए पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. पण नोकरी न करता त्यांनी शेती करायचं ठरवलं. शेतीमध्ये पण त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. पारंपारिक शेती त्यांना करायची नव्हती. वेगळं काहीतरी पीक घेऊन त्यामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न कमवायचं होतं.
advertisement
म्हणून त्यांनी ठरवलं की आपण अद्रक शेती करूयात. गेल्या दहा वर्षांपासून ते अद्रकीचे लागवड करतात. मागच्या वर्षी त्यांनी पाच एकरामध्ये अद्रकीची लागवड केली होती. त्यामधून त्यांना चांगला नफा मिळाला. या वर्षी त्यांनी सहा एकरमध्ये अद्रकीची लागवड केलेली आहे. अद्रकीचा पीक येण्यासाठी साधारणपणे दहा महिन्याचा कालावधी पण संतोष यांनी त्यांच्या दोन एकर मधलं अद्रक हे सहा महिन्यातच हार्वेस्ट केलं आणि दोन एकरमधून त्यांना 11 लाख रुपये एवढा नफा मिळाला आहे.
advertisement
अजून चार एकर मधलं त्यांचा अद्रक काढणं बाकी आहे. त्यामधून त्यांना साधारणपणे 10 ते 11 लाख रुपये एवढा नफा मिळेल. संतोष यांच्या शेतातील अद्रकाला बाजारपेठामध्ये मोठी मागणी आहे. त्याचबरोबर त्यांच्या अद्रक्याच्या बेण्याला सगळ्यात जास्त मागणी आहे. यामधून त्यांना जास्त नफा होतो, असं देखील संतोष यांनी सांगितलं आहे.
तुम्ही सातत्याने आणि व्यवस्थितरित्या जर अद्रक शेती केली. तर यामधून तुम्ही चांगला नफा कमवू शकता, असंही संतोष यांनी  शेतकऱ्यांना सांगितलं आहे.
मराठी बातम्या/कृषी/
नोकरी न करता शेती करायचं ठरवलं, पारंपारिक पद्धतीला दिला फाटा, 6 महिन्यात कमावला 11 लाख नफा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement