एक एकरमध्ये लागवड, 7 महिन्यांत दोनदा उत्पन्न, बीडमधील शेतकऱ्यासाठी हे पीक ठरलं फायदेशीर!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मागील वर्षी कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती. असं असताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे. आम्ही आपणास बीड येथील अनिल मस्के या शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहोत.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : पर्जन्यमान कमी असल्याकारणाने मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये कांद्याचे उत्पन्न हे फारच कमी प्रमाणात घेतलं होतं. मागील वर्षी कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती. असं असताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे. आम्ही आपणास बीड येथील अनिल मस्के या शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहोत. ज्यांनी पाच एकर शेतीतून एक एकरमध्ये कांद्याची लागवड केली. यामधून त्यांनी लाखोंची कमाई केली आहे.
advertisement
कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा याचं उत्तम गणित हे अनिल मस्के या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. पारंपरिक शेती न करता त्यांनी काहीतरी वेगळं करावं म्हणून कांद्याच्या शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त दहा गुंठे एवढ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली होती.
advertisement
पहिल्याच वर्षी त्यांना कांद्याच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळालं आणि त्यांनी पुन्हा सलग तीन ते चार वर्षे कांद्याचे पिकाची लागवड आपल्या शेतीमध्ये केली. अहोरात्र कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्याने एक वेगळी कल्पनाशक्ती लावली आणि फक्त सात महिन्यांच्या कालावधीमध्ये कांद्याची दोन वेळा उत्पन्न घेण्याचा ठरवलं. खरं तर हा प्लॅन अगदी सक्सेस ठरलेला आहे.
advertisement
सात महिन्यांच्या कालावधीमध्ये दोन पीक घेत या शेतकऱ्याने कमीत कमी क्षेत्र आणि कमी वेळेमध्ये चांगलं उत्पन्न कसे मिळवायचं हे दाखवून दिलेलं आहे. खरंतर कांदा उत्पादनातून या शेतकऱ्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्याची कहाणी लाभदायक ठरू शकते असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये कांद्याचे पिकाची लागवड करून त्या माध्यमातून अगदी चांगलं उत्पन्न मिळवत स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलं आहे. एक एकरमधील कांदा या पिकाच्या लागवडीतून मला दोन ते अडीच लाखांपर्यंत कमाई होते, असं अनिल मस्के सांगतात.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Dec 13, 2024 2:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
एक एकरमध्ये लागवड, 7 महिन्यांत दोनदा उत्पन्न, बीडमधील शेतकऱ्यासाठी हे पीक ठरलं फायदेशीर!






