Gold Rate : सोन्याचे दर वाढले आता पुढे...; 'भारतीय नास्त्रेदामस'ने सांगितलं भविष्यात काय होणार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gold Price Prediction : इंडियन नास्त्रेदामस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ऋषीने सोन्याचे दर इतके वाढणार की ते परवडणार नाही, असं 400 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. ही भविष्यवाणी आता खरी ठरली आहे. त्यांनी त्यानंतरची परिस्थितीही सांगितली, जी आता खरी ठरते की काय, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.
advertisement
सोन्याच्या दागिन्यांना लग्नात विशेष महत्त्व असतं. इतर कोणतेही दागिने कोणत्याही धातूचे चालतील पण लग्नात मंगळसूत्र मात्र सोन्याचं हवं. लग्नात सोन्याची थाळी किंवा वाटी घालण्याची खूप जुनी परंपरा आहे. पण आता सोन्याचे दर पाहता ही परंपरा चालू ठेवणं कठीण दिसतं. शिवाय तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात दहा ग्रॅम सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
पोतुलुरी वीरब्रह्मम यांनी ब्रह्मम् गारी कलाग्ननम् हे तेलगु भाषेत पुस्तक लिहिलं. या पुस्तकात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याच्या भाकितांचा उल्लेख आहे. लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या कलाज्ञानममध्ये सांगितलेल्या गोष्टी आज खऱ्या ठरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सोन्याबाबतची भविष्यवाणी जी आज खरी ठरताना दिसत आहे.
advertisement
advertisement
advertisement










