ZP Election: काहीही होऊ शकतं! ठाकरे गट, भाजप आणि अजित पवार गटाची छुपी युती, राजकारणात खळबळ

Last Updated:

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाला जबरदस्त कलाटणी मिळाली आहे

News18
News18
शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी: महापालिका निवडणुकीचा धुरळा बसल्यानंतर आता राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आाहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी एकत्र लढत आहे. पण  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाला जबरदस्त कलाटणी मिळाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यात छुपी युती झाली असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
दापोली तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारांची केलेली विभागणी ही केवळ योगायोग नसून, पूर्वनियोजित रणनिती असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. हर्णे आणि पालगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, केळशी आणि कोळवंद्रे येथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार, तर जालगाव आणि दाभोळमध्ये भाजपचे उमेदवार उभे राहिल्याने “एकमेकांच्या विरोधात नाही, तर एकमेकांसाठीच ही लढत?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
advertisement
दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मात्र वेगळ्याच आक्रमक भूमिकेत आहे. भाजपशी काडीमोड घेत स्वबळाचा नारा देत शिंदे शिवसेनेनं सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात उमेदवार उभे केले आहेत.
शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, “वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं आम्ही स्वतंत्रपणे मैदानात उतरलो.”
advertisement
तर, एकीकडे छुप्या युतीचे आरोप, दुसरीकडे स्वबळाची थेट लढाई आणि तिसरीकडे सेना विरुद्ध सेना संघर्ष
यामुळे दापोली तालुक्यातील पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक राज्यातील सर्वात चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election: काहीही होऊ शकतं! ठाकरे गट, भाजप आणि अजित पवार गटाची छुपी युती, राजकारणात खळबळ
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement