मराठी सिनेमाच्या रिलीज डेटवरून वाद, अमेय खोपकरांच्या टीकेवर दिग्पाल लांजेकरने अखेर मौन सोडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
पुन्हा एकदा साडे माडे तीन आणि रणपति शिवराय या सिनेमांच्या रिलीज डेटवरून निर्माते अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेवर अखेर दिग्पाल यांनी मौन सोडलं आहे.
मराठी सिनेमा </a>आमने सामने आले आहेत. एक म्हणजे 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' आणि दुसरा म्हणजे 'रणपति शिवराय'. पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमाचे निर्माते आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी रणपति शिवरायचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. " width="1200" height="900" /> जानेवारी महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दोन मराठी सिनेमा आमने सामने आले आहेत. एक म्हणजे 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' आणि दुसरा म्हणजे 'रणपति शिवराय'. पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमाचे निर्माते आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी रणपति शिवरायचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या संपूर्ण प्रकरणावर आता रणपति शिवरायचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मटाशी बोलताना ते म्हणाले, "आमचा सुरूवातीला फोन कॉल झाला. त्यांना मी हे स्पष्ट केलं की, संपूर्ण सिनेसृष्टीला त्यांचा किती आदर आहे हे माहितीये. त्यांनी अनेकांना मदत केलीये. मी या चित्रपटाचा फक्त लेखक-दिग्दर्शक आहे. मी निर्माता नाहीये. तारखा ठरवणं आणि निर्णयक्षमता ही निर्मात्याची असते."
advertisement
advertisement
दिग्पाल लांजेकर पुढे म्हणाले, "पॅनोरामा आणि आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की, फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहेत आणि हे शिवचरित्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पहावं, अशी पहिल्यापासून आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही अलीकडे घ्यावं, असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. निर्माते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य आहेय आणि फोन घेतले नाहीत असं काही झालेलं नाही"









