T20 World Cup : मोठी बातमी! टी20 वर्ल्ड कप स्पर्धेवर बांगलादेश संघाचा बहिष्कार, कुणाला संधी मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने विश्वचषक टी ट्वेन्टी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेश सरकार आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला.
T20 World Cup News : बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने विश्वचषक टी ट्वेन्टी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेश सरकार आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव बांग्लादेश संघाने स्पर्धेतील सामने श्रीलंकेत खेळविण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी मान्य न झाल्याने बांग्लादेश क्रिकेट संघाने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
खरं तर टी20 वर्ल्ड कपमधील सामने भारतात खेळवण्यावरून बांगलादेशने विरोध दर्शवला होता.या विरोधानंतर बुधवारी आयसीसीने तातडीने ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीत आयसीसीच्या 16 सदस्यांनी मतदान केलं होतं.ज्यामध्ये बांगलादेशच्या बाजूने दोन आणि उरलेल्या 14 जणांनी विरोधात मतदान केलं होतं. यामध्ये फक्त बांग्लादेश आणि पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने मतदान केल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर या बैठकीनंतर आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आणखी एक अल्टीमेट दिला गेला होता.ज्यामध्ये त्यांना पुन्हा विचार करण्याची संधी देण्यात आली होती.
advertisement
आयसीसीच्या अल्टीमेटमनंतर आज बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी बांगलादेश सरकारची बातचीत केली होती.या चर्चे दरम्यान बांगलादेश सरकारने आपल्या क्रिकेट संघात भारतात खेळण्यास मंजूरी दिली नव्हती. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड वर्ल्डकप खेळणार
बांगलादेश आता स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळे स्कॉटलँड संघाची वर्ल्डकपमध्ये एंन्ट्री होणार आहे. वर्ल्डकपला आता जवळपास 15 दिवस उरले आहेत.त्यामुळे आयसीसीकडे वेळ खूप कमी आहेत.त्यात स्कॉटलँड वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होऊ शकला नव्हता.युरोपीयन क्लालिफायरमध्ये तो नेदरलँड,ईटली आणि जर्सी या संघांच्या मागे राहिला होता.त्यामुळे त्यांना वर्ल्ड कपच तिकीट मिळू शकलं नव्हतं. पण आता आयसीसीने बांगलादेशला बाहेर केल्यानंतर स्क्वॉटलँडला वर्ल्डमध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 4:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : मोठी बातमी! टी20 वर्ल्ड कप स्पर्धेवर बांगलादेश संघाचा बहिष्कार, कुणाला संधी मिळणार?









