वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी लेक उतरली मैदानात, करतीये दूध विक्री व्यवसाय, मोनाच्या जिद्दीचा प्रवास! Video

Last Updated:

ही गोष्ट आहे मोना नरोटे या तरुणीची, जिने परिस्थितीपुढे हार न मानता आपल्या वडिलांचे घर आणि सन्मान दोन्ही वाचवले.

+
News18

News18

नाशिक: मुलगा वारसा चालवतो या जुन्या विचारांना छेद देत नाशिकच्या एका मराठी तरुणीने आपल्या वडिलांच्या व्यवसायाचा डोलारा केवळ सावरलाच नाही, तर कष्टाच्या जोरावर कुटुंबावर असलेले कर्जाचे डोंगरही उपसले आहेत. ही गोष्ट आहे मोना नरोटे या तरुणीची, जिने परिस्थितीपुढे हार न मानता आपल्या वडिलांचे घर आणि सन्मान दोन्ही वाचवले.
शिक्षणाची ओढ, पण परिस्थितीचा अडसर
मोना नरोटे हिला शिक्षणाची प्रचंड आवड होती, मात्र घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने तिला केवळ 12 वी पर्यंतच शिक्षण घेता आले. चार बहिणींची जबाबदारी आणि वडिलांची ओढाताण पाहून मोनाने लहानपणापासूनच त्यांना कामात मदत करण्यास सुरुवात केली होती. घराला हातभार लागावा म्हणून तिने काही काळ खासगी नोकरीही केली, मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिला त्यात सातत्य ठेवता आले नाही.
advertisement
संघर्षातून उभा राहिला व्यवसाय
लग्नानंतर मुलाची जबाबदारी अंगावर असतानाही, वडिलांचे कष्ट तिला स्वस्थ बसू देत नव्हते. वडिलांच्या डोक्यावर असलेले कर्ज आणि तारण ठेवलेले घर सोडवणे हेच तिचे मुख्य ध्येय होते. अखेर तिने आपल्या चुलत बहिणीला सोबत घेतले आणि वडिलांचा पारंपरिक कुल्फी विक्रीचा व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला.
advertisement
जय हरी मसाला दूध सेंटरची ओळख
सध्या नाशिकमध्ये कडाक्याची थंडी वाजत आहे. या संधीचे सोने करत मोनाने आपल्या केंद्रावर केशर मसाला दूध विक्रीला सुरुवात केली आहे. तिच्या हाताची चव आणि प्रामाणिक कष्ट यामुळे अल्पावधीतच 'जय हरी मसाला दूध सेंटर' नाशिककरांच्या पसंतीस उतरले आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून ती आता वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कर्जाचा भार हलका करत आहे.
advertisement
वडिलांचे ओझे कमी करणे हेच माझे पहिले कर्तव्य होते. आज जेव्हा मी त्यांना तारण ठेवलेले घर सोडवण्यासाठी मदत करते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील समाधान हेच माझ्या कष्टाचे फळ आहे, मिळत असल्याचे मोना सांगत असते. केवळ नशिबाला दोष न देता, उपलब्ध साधनसामग्रीतून कष्टाची तयारी ठेवली तर यश नक्की मिळते, हेच मोनाने सिद्ध केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी लेक उतरली मैदानात, करतीये दूध विक्री व्यवसाय, मोनाच्या जिद्दीचा प्रवास! Video
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement