34 KM मायलेज, 6 एअरबॅगसह अडव्हान्स फीचर्स या आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त कार 

Last Updated:
Cheapest Car In India: आज आम्ही तुमच्यासाठी भारतीय मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या 5 सर्वात स्वस्त कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. चांगले मायलेज, सेफ्टी आणि कंफर्टसह उपलब्ध या गाड्यांना केवळ ₹3,49,900 च्या सुरुवाती एक्स शोरुमवर खरेदी करु शकता. तुम्ही फर्स्ट टाइम बायर असाल, तर ही बातमी अवश्य वाचा.
1/11
Cheapest Car In India: भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कार मार्केट आहे. येथे स्वस्त आणि चांगल्या कार आहेत. तुम्हाला येणाऱ्या काळात चांगली गाडी खरेदी करायची असेल, पण बजेट टाइट असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आम्ही सांगणार आहोत. आज आपण भारतीय मार्केटच्या 5 सर्वात स्वस्त कारच्या लिस्टविषयी जाणून घेणार आहोत.चला त्यांच्या किंमती, फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनवर एक नजर टाकूया.

advertisement
2/11
Maruti Suzuki S-Presso: लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर मारुती एसप्रेसो आहे. ही केवळ 3.50 लाख रुपयांच्या सुरुवाती एक्स-शोरुम किंमतीवर खरेदी केली जाऊ शकते. ही मिनी-एसयूव्ही स्टाइलची हॅचबॅक आहे. ज्यामध्ये चांगला ग्राउंड क्लीयरेन्स (180 मिमी) मिळतो.

3/11
त्याचे 998 सीसी पेट्रोल इंजिन 24-25 किमी/लीटर इंधन कार्यक्षमता देते, तर सीएनजी प्रकार 32-33किमी/किलोग्रॅम इंधन कार्यक्षमता देते. फीचर्समध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एअर कंडिशनिंग, पॉवर स्टीअरिंग आणि सहा एअरबॅग्ज यासारख्या आवश्यक फीचर्सचा समावेश आहे.

4/11
Maruti Suzuki Alto K10 : मारुती सुझुकी अल्टो के10 ही कार फक्त ₹3.70 लाख (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. ही कॉम्पॅक्ट हॅचबॅक लहान शहरे आणि गावांसाठी योग्य आहे. 998 सीसी के-सिरीज इंजिन अत्यंत परिष्कृत आहे आणि पेट्रोलवर 24.9 किमी/लीटर आणि सीएनजीवर 33.85 किमी/किलो इंधन बचत देते.

5/11
फीचर्समध्ये 6 एअपबॅग्स (स्टँडर्ड), टचस्क्रीन, रियर पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि मॅन्युअल/ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनचा समावेश आहे. ही कार खुप हलकी आणि सहज चालवता येणार आहे. ज्यामुळे नवीन ड्रायव्हर्सना कॉन्फिडेन्स मिळतो. मेंटेनेंस कॉस्टही वार्षिक 4-6 हजार रुपयांहून जास्त येत नाही.

6/11
Renault Kwid : रेनॉल्ट क्विडची किंमत ₹4.30 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ती एसयूव्ही सारखी दिसते. तिचे 999 सीसी इंजिन 21-22 किमी/लीटर इंधन कार्यक्षमता देते. यात 8-इंच टचस्क्रीन, रिव्हर्स कॅमेरा, कीलेस एंट्री आणि 184 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आहे.

7/11
हे वाहन तरुणांमध्ये आवडते आहे, त्याच्या धाडसी आणि आधुनिक डिझाइनमुळे. काही व्हेरिएंटमध्ये AMT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील येतो, जो शहरातील वाहतुकीत आराम देतो. सेफ्टी रेटिंग 1-2 स्टार असले तरी, फीचर्समुळे ते एक व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन बनते.

8/11
Tata Tiago : टाटा टियागोची एक्स शोरुम किंमत 4.57 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. सेफ्टीच्या बाबतीत ही सर्वात मजबूत आहे. ग्लोबल NCAP मध्ये टाटा टिआगोला 4-स्टार रेटिंग मिळाली आहे. याची 1199 सीसी इंजन पेट्रोलमध्ये 19 किमी/लीटर आणि सीएनजीमध्ये 28 किमी/किलो मायलेज देते.

9/11
हर्मन साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि सहा एअरबॅग्ज या फीचर्सचा समावेश आहे. बिल्ड क्वालिटी उत्कृष्ट आहे, ज्यामुळे ती दीर्घकालीन ड्रायव्हिंगसाठी एक टिकाऊ पर्याय बनते. सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्यांसाठी ही कार आदर्श आहे.

10/11
Maruti Suzuki Celerio : मारुती सुझुकी सेलेरियोची किंमत ₹4.70 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ती सर्वोत्तम ऑटोमॅटिक पर्याय देते आणि 25-26 किमी/लीटर (पेट्रोल) आणि 34 किमी/किलो (सीएनजी) इंधन कार्यक्षमता देते. स्पेस चांगला आहे, बसण्याची सोय आरामदायी आहे आणि फीचर्समध्ये टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो आणि रियर एसी व्हेंट्स समाविष्ट आहेत.

11/11
आमचे मत: एकंदरीत, या पाच कार बजेटमध्ये सर्वात चांगील व्हॅल्यू देतात.  सेवा आणि सुटे भागांच्या उपलब्धतेमुळे मारुती कार उत्कृष्ट आहेत, तर टाटा मोटर्स सुरक्षिततेच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत. तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही यापैकी एक कार निवडू शकता. सुदैवाने, त्या सर्व कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही उच्च दर्जाचे प्रकार निवडले तर ऑन-रोड किंमत वाढू शकते.

BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement