Petrol Price : इथे एक लिटर पेट्रोलची किंमत 2 रुपये, हा देश साउदी किंवा ईरान नाही तर...90 टक्के लोकांना हे माहित नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला आज आम्ही असं काही सांगणार आहोत ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जगात एक असाही देश आहे जिथे पेट्रोलची किंमत एखाद्या चॉकलेटपेक्षाही कमी आहे?
आजच्या काळात खिशातून 100 रुपये काढले तरी गाडीत एक लिटर पेट्रोल पडत नाही. पेट्रोलचे भाव थोडे जरी वाढले तरी मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडते. आपण अनेकदा विचार करतो की, पेट्रोलचे भाव कधी कमी होतील का? पण तुम्हाला आज आम्ही असं काही सांगणार आहोत ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जगात एक असाही देश आहे जिथे पेट्रोलची किंमत एखाद्या चॉकलेटपेक्षाही कमी आहे?
advertisement
हो, तुम्ही बरोबर वाचलंत! जिथे भारतात पेट्रोल 100 रुपयांच्या पार आहे, तिथे या देशात फक्त 2 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे. डॉलरमध्ये सांगायचे तर अवघ्या $0.002 मध्ये इथे एक लिटर पेट्रोल मिळते. हा देश कोणता असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आणि एवढ्या कमी किंमतीत कसा काय हा देश पेट्रोल विकू शकतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल? चला या देशाबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
advertisement
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला (Venezuela) हा तो देश आहे, जो सध्या आपल्या इंधन दरांमुळे आणि जागतिक राजकारणामुळे चर्चेत आहे. या देशाकडे जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा आहे. इतकी संपत्ती की अरब देशांनाही याचा हेवा वाटेल. मात्र, अमेरिकेने घातलेले निर्बंध आणि अंतर्गत राजकीय पेचप्रसंगामुळे हा देश सध्या मोठ्या संकटातून जात आहे.
advertisement
advertisement
इतकी संपत्ती असूनही उत्पादन कमी का?एकीकडे खजिना रिकामा नाही, पण दुसरीकडे उत्पादन मात्र कोलमडले आहे. 1990 च्या दशकात व्हेनेझुएला दररोज 35 लाख बॅरल तेलाचे उत्पादन करायचा. पण आज मादुरो सरकारच्या काळात आणि अमेरिकन निर्बंधांमुळे हे उत्पादन 10 लाख बॅरलपेक्षाही खाली आले आहे. सध्या जागतिक तेल उत्पादनात व्हेनेझुएलाचा वाटा केवळ 1% उरला आहे.
advertisement
advertisement
advertisement
व्हेनेझुएलाचे उदाहरण हे सांगण्यासाठी पुरेसे आहे की, केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती असून चालत नाही, तर ती वापरण्यासाठी लागणारी स्थिर अर्थव्यवस्था आणि चांगले आंतरराष्ट्रीय संबंधही तितकेच महत्त्वाचे असतात. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल विकूनही हा देश आज आर्थिक विवंचनेत आहे, हे जगासाठी एक मोठे आश्चर्य आहे.










