Pune Food : पावभाजी ते अंडा राईस, मिळतायत फक्त 30 रुपयांपासून, पुण्यात इथं असते खाण्यासाठी मोठी गर्दी
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कमी किमतीत चांगलं पोटभर, पौष्टिक आणि चवदार जेवण मिळणं हीच राईसची खरी ओळख बनली आहे.
पुणे : पुण्यातील प्रभात रोड–डेक्कन जिमखाना परिसरात असलेले रुस्टम राईस हे इराणी–पारसी आणि महाराष्ट्रीयन चवींचं अनोखं फ्युजन असणारं फूड आउटलेट सध्या चांगलंच चर्चेत आहे. कॉलेज परिसर, आणि रहिवासी भागाजवळ असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हे ठिकाण विशेष लोकप्रिय ठरत आहे. कमी किमतीत चांगलं पोटभर, पौष्टिक आणि चवदार जेवण मिळणं हीच रुस्टम राईसची खरी ओळख बनली आहे.
या आउटलेटची सुरुवात पारंपरिक पारसी पदार्थांना आधुनिक, सोप्या आणि परवडणाऱ्या स्वरूपात मांडण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अनेक पदार्थ सोया, अंडे किंवा विविध डाळींपासून तयार केले जात असल्याने हे पदार्थ प्रोटिन-रिच आहेत. त्यामुळे चव आणि आरोग्य यांचा उत्तम समतोल येथे पाहायला मिळतो.
advertisement
विशेष म्हणजे, कोणत्याही पदार्थांमध्ये फूड कलर, बटर, चीज किंवा अजिनोमोटोचा वापर केला जात नाही. सोया खीमा पॅटीस कमी तेलात शॅलो फ्राय केली जाते, तर त्यासोबत दिला जाणारा केचप पूर्णपणे घरगुती पद्धतीने, कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह, रंग न वापरता तयार केला जातो. त्यामुळे ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा कुठेही हे पदार्थ सहजपणे खाता येतात.
रुस्टम राईस हे क्यूएसआर फॉरमॅटमध्ये चालवले जाते. त्यामुळे कमी वेळेत जेवण मिळते आणि ग्राहक त्यांच्या भुकेनुसार प्रमाण निवडू शकतात. या आउटलेटमागील संकल्पना मांडणारे रोनक नाईक हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून, त्यांनी आपल्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या अभ्यासातून हा वेगळा प्रयोग साकारला आहे.
advertisement
सध्या येथे 15 प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत. यामध्ये धनसाक सूप, शेवगा सूप, धनसाक पावभाजी, अंडा धनिया राईस, सोया खीमा पॅटीस, सोया पुदिना राईस यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे पदार्थ अवघ्या 30 रुपयांपासून उपलब्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच रुस्टम राईसची ओळख वाढली असून, सिम्पल, गुड फूड देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे रोनक नाईक यांनी सांगितले.
advertisement
कमी किमतीत, दर्जेदार आणि आरोग्यदायी इराणी–पारसी आणि महाराष्ट्रीयन जेवणाचा अनुभव घ्यायचा असेल, तर डेक्कनमधील रुस्टम राईस हे नक्कीच एक वेगळं आणि आवर्जून भेट द्यावं असं ठिकाण ठरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 3:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pune Food : पावभाजी ते अंडा राईस, मिळतायत फक्त 30 रुपयांपासून, पुण्यात इथं असते खाण्यासाठी मोठी गर्दी







