छत्रपती संभाजीनगर : मेंदू हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मेंदू शरीराच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो. मेंदू तुम्हाला विचार, हालचाल, अनुभव, श्वास आणि बरेच काही करण्यास मदत करतो. एवढेच नाही तर मेंदूचे मुख्य कार्य शरीराच्या विविध भागांना पोषण देणे हे देखील आहे. तर मेंदूची वाढ चांगली व्हावी किंवा मेंदूने चांगलं काम करावे? यासाठी आपण काय खायला हवं? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ रसिका देशमुख सांगितलेली आहे.



