सागर हे कॉम्प्युटर इंजिनिअर आणि एम.बी.ए. मार्केटिंग या क्षेत्रातील पदवीधर आहेत. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष नाशिकच्या बाहेर जाऊन नोकरीदेखील केली. परंतु त्यांच्या मनात नेहमी खंत निर्माण होत असे. नेहमी त्यांना असे वाटायचे, आपण इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यासाठी नाही तर इतरांना नोकरी देणारे बनायला हवे. याकरता त्यांनी नोकरी सोडून स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचे ठरवले.
advertisement
या काळात त्यांनी आपल्या मित्राला, आपण मिळून काही सुरू करूयात, अशी कल्पना दिल्यानंतर गेल्या 8 वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आहे. ज्याचे नाव त्यांनी बेंजोस द फूड चेन असे ठेवले आहे. कारण त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव जोडायचे होते आणि त्यांनी ते पूर्णसुद्धा करून दाखवले.
आज सागर यांचे फक्त नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरदेखील नाव झळकते आहे. आज त्यांचे 45 पेक्षाही अधिक अशा विविध शहरांमध्ये बेंजोस या नावाने कॅफे आहेत. नोकरी करणार नाही तर नोकरी देणार हे त्यांचे स्वप्न आज त्यांनी पूर्ण केले असून आज अनेक लोकांना ते चांगला रोजगार पुरवत आहेत.
मी आज पण नोकरी करत राहिलो असतो तर आज माझ्या फक्त गरजा पूर्ण करू शकलो असतो, परंतु आज फक्त गरजाच नाही तर माझे स्वप्नदेखील मी पूर्ण करत आहे, असे सागर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
तुम्हाला देखील यांच्यासोबत जुळून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हीदेखील आपल्या शहरात किंवा गावात बेंजोसची स्थापना करू शकता. ज्याची संपूर्ण मदत आणि माहिती सागर हे तुम्हाला देत असतात. याकरता त्यांचे इंस्टाग्राम पेज Banjo’s_india या नावाने आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकणार आहात.