TRENDING:

36 शेळ्यांतून 6-7 लाखांचा नफा, पारंपरिक नाही तर बंदिस्त शेळीपालनामुळे शेतकरी मालामाल

Last Updated:

सुरुवातीला 16 शेळ्यांपासून सुरू झालेला व्यवसाय त्यांनी 36 शेळ्यांपर्यंत नेला आहे. या शेळ्यांमधून त्यांनी वर्षाला सुमारे 6-7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

advertisement
सितराज परब- प्रतिनिधी
advertisement

सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नाटळ या गावातील नागेश बोडेकर या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन सुरू करून यशस्वीतेचा आदर्श उभा केला आहे. शेतीत नेहमी नवीन प्रयोग करण्याची आवड असलेल्या नागेश बोडेकर यांनी भात, काजू, आंबा अशी पारंपरिक शेती करताना, शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा निर्णय घेतला.

शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बीटल जातीच्या 16 माद्या आणि 1 नर शेळी खरेदी केली. योग्य प्रकारे नियोजन करून व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला 16 शेळ्यांपासून सुरू झालेला व्यवसाय त्यांनी 36 शेळ्यांपर्यंत नेला आहे. या शेळ्यांमधून त्यांनी वर्षाला सुमारे 6-7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

advertisement

बीटल जातीच्या शेळ्या प्रामुख्याने ब्रिडींगसाठी पाळल्या जातात. या शेळ्यांच्या पिल्लांना मोठी मागणी असल्याने नागेश बोडेकर इतर शेळीपालन व्यवसायिकांना पिल्ले विकून नफा मिळवत आहेत. बीटल शेळ्यांची पिल्ले देण्याची क्षमता जास्त असून, पिल्लांचे वजन लवकर भरत असल्याने हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.

शेळीपालन करताना ते काटेकोरपणे निगा राखतात. खुराकात तुरीचा भुसा, चण्याचा भुसा आणि ओला चारा यांचा समावेश असतो. तसेच, स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनाला ते प्राधान्य देतात. कोणती शेळी आजारी आहे, त्यावर योग्य उपचार करणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे यावर ते विशेष लक्ष देतात.

advertisement

नागेश बोडेकर सांगतात की, बंदिस्त शेळीपालनामुळे व्यवस्थापन सोपे होते आणि नियोजन पद्धतशीर केले तर नफा हमखास होतो. 36 शेळ्यांपासून त्यांना वर्षाला 140-150 पिल्ले मिळतात, ज्यातील प्रत्येक पिल्लू सरासरी 9000 रुपयांना विकले जाते. त्यामुळे आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ते सांगतात.

मराठी बातम्या/मनी/
36 शेळ्यांतून 6-7 लाखांचा नफा, पारंपरिक नाही तर बंदिस्त शेळीपालनामुळे शेतकरी मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल