BoJ च्या ताज्या आर्थिक आढावा बैठकीत असे नमूद केले गेले की, एकूण नऊ आर्थिक क्षेत्रांपैकी बहुतेक क्षेत्रं सध्या सुधारत आहेत किंवा मध्यम गतीने वाढत आहेत. मात्र त्यानंतर जारी केलेल्या निवेदनात बँकेने स्पष्ट सांगितलं – “जपानी अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता वाढत आहे.” या निवेदनात ट्रम्प यांच्या टॅरिफचा थेट उल्लेख नसला तरी, "काही कंपन्यांनी उत्पादन आणि नफ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे," असे स्पष्टपणे म्हटले गेले आहे.
advertisement
ट्रम्प यांच्या टॅरिफचा तात्पुरता परिणाम
BoJ च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही आर्थिक स्थिती विश्लेषण करणारी रिपोर्ट ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर होण्यापूर्वी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या टॅरिफचा संपूर्ण परिणाम या रिपोर्टमध्ये दिसून येत नाही.
सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे?
Bank of Japan ने म्हटले आहे की, परदेशी पर्यटकांची मजबूत खरेदी आणि लक्झरी वस्तूंवरील मागणीमुळे देशातील खपाला काहीसा आधार मिळाला आहे. कंपन्या अजूनही Capex (Capital Expenditure – भांडवली गुंतवणूक) करण्यासाठी तयार आहेत. काही क्षेत्रांमध्ये पगारवाढ होत आहे, मात्र काही लहान उद्योग अजूनही पगारवाढीबाबत सावध भूमिका घेत आहेत. जपानमधील अनेक कंपन्या वाढत्या import cost (आयात खर्च) ग्राहकांवर टाकत आहेत आणि काही कंपन्या किंमती वाढवण्याचाही विचार करत आहेत.
मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता
ट्रम्प प्रशासनाने Auto import वर 25% कर आणि जपानी वस्तूंवर 24% रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, यामुळे जपानची आर्थिक विकासदर 0.8% पर्यंत खाली येऊ शकतो. कारण जपानची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने निर्यातीवर आधारित आहे आणि यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.
पुढे काय?
BoJ ची पुढची आर्थिक धोरण बैठक 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान होणार आहे. यामध्ये बँक 0.5% व्याजदर कायम ठेवेल, अशी शक्यता आहे. तसेच नवीन तिमाही आर्थिक अंदाज रिपोर्टही सादर केला जाईल, ज्यात टॅरिफच्या परिणामांबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळेल.
एकूण चित्र काय दर्शवतं?
ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांनी केवळ जागतिक बाजारातच खळबळ माजवलेली नाही, तर जपानसारख्या मजबूत निर्यातक देशाच्या आर्थिक स्थैर्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. Bank of Japan ची येणारी बैठक आता अधिकच महत्त्वाची ठरणार आहे.