TRENDING:

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, 1 एप्रिलपासून किती वाढणार, इथे पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Last Updated:

केंद्र सरकारने UPS ही नवीन पेन्शन योजना आणली आहे, जी 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. ही योजना NPS पेक्षा वेगळी असून, बाजारातील अस्थिरतेपासून सुरक्षित आहे व मासिक किमान 10,000 रुपयांची हमी देते.

advertisement
मुंबई: केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांसाठी युनिफाइड पेंशन स्कीम (UPS) ही नवीन पेन्शन योजना आणली आहे. ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. या योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर हमखास महिन्याला पेन्शन देणार आहे, जे शेअर मार्केट किंवा डेथ मार्केट चढ-उतारांवर अवलंबून नसेल.
News18
News18
advertisement

काय आहे युनिफाइड पेंशन स्कीम?

NPS ही योजना स्टॉक मार्केट आणि डेथ मार्केटच्या कामगिरीवर आधारित पेन्शन देते. मात्र, UPS मध्ये कर्मचारी निवृत्तीनंतर निश्चित रक्कम मिळेल. ही रक्कम शेअर मार्केटच्या अस्थिरतेनुसार बदलत नाही. विशेष म्हणजे, UPS योजनेंतर्गत कर्मचार्‍यांना मासिक किमान 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची हमी देतं.

UPS योजना कधीपासून लागू होणार?

advertisement

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार ही नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाणार आहे. एकदा कर्मचारी UPS योजनेचा पर्याय निवडला, की त्याला पुन्हा NPS योजनेत परत जाण्याचा पर्याय मिळणार नाही.

पेन्शन कशाप्रकारे कॅल्क्युलेट केली जाणार?

मनी कंट्रोलने दिलेल्य्या वृत्तानुसार कर्मचारी निवृत्तीच्या वेळेस त्याचा मासिक सरासरी मूलभूत वेतन (Basic Pay) आणि सेवावर्षांच्या आधारावर पेन्शन निश्चित केली जाईल. पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी एक विशिष्ट फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे:

advertisement

फॉर्म्युला:

महिन्याचा बेसिक पे ÷ 12 × 50%

उदाहरण: 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केली असेल तर त्या कर्मचार्‍याचे निवृत्तीच्या वेळी सरासरी महिन्याचा पगार हा 1,00,000 रुपयांच्या आससपास असेल आणि त्याने 25 वर्षे सेवा बजावली असेल, तर त्याला मिळणारी पेन्शन असेल:

1,00,000 ÷ 12 × 50% = 50,000 रुपये महिना

advertisement

उदाहरण : 25 वर्षांपेक्षा कमी सेवा एखाद्या कर्मचार्‍याने केली असेल, तर पेन्शनचे प्रमाण 80% असेल.

1,00,000 ÷ 12 × 50% × 0.8 = 40,000 रुपये मासिक पेन्शन असेल

उदाहरण: जर कर्मचार्‍याचे मासिक वेतन ₹15,000 असेल, तर त्याला हमी पेन्शन ₹10,000 मिळेल, कारण हे किमान रक्कमपेक्षा कमी आहे.

कोण घेऊ शकतं लाभ?

advertisement

या योजनेत केवळ 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा असलेले कर्मचारीच सहभागी होऊ शकतात. 25 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचार्‍यांसाठी प्रोपोर्शनेट फॅक्टर लागू केला जाईल.

UPS योजनेची वैशिष्ट्ये:

बाजारातील अस्थिरतेपासून सुरक्षित आहे. निवृत्तीनंतर निश्चित मासिक पेमेंट मिळतं, जे इतर कुठल्याही योजनेत मिळत नाही. पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी पारदर्शक फॉर्म्युला वापरला जातो. कमीत कमी 10,000 रुपयांचं पेन्शन मिळण्याची हमी आहे. कर्मचार्‍यांसाठी ही योजना वरदान आहे. या योजनेमुळे सरकारी कर्मचार्‍यांना भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेबाबत दिलासा मिळणार आहे. निवृत्तीनंतरची चिंता मिटवण्यासाठी ही योजना एक मोठा दिलासा ठरणार आहे.

केंद्र सरकारची युनिफाइड पेंशन स्कीम ही सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी दिलासा देणारी योजना आहे. बाजारातील अस्थिरतेपासून मुक्तता आणि निश्चित मासिक रक्कम ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत. कर्मचारी भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना एक वरदान ठरू शकते.

मराठी बातम्या/मनी/
पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, 1 एप्रिलपासून किती वाढणार, इथे पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल