या नवीन सिस्टममध्ये यूझरला पेमेटं करण्यासाठी फक्त फोनच्या स्क्रीनवर बोट ठेवायचे आहे किंवा फेस स्कॅन करायचा आहे. यानंतर पेमेंट लगेच ऑथेंटिकेट होऊन पूर्ण होईल. यामुळे पेमेंट करणे पहिल्यापेक्षा जास्त सोपे आणि सुरक्षित मानले जात आहे.
या अॅप्समध्ये मिळेल फीचर
- Amazon Pay
- Google Pay
- PhonePe
- Paytm
येत्या काळात इतर यूपीआय अॅप्समध्येही हा ऑप्शन मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
हे फीचर कसे काम करेल?
आजकाल बहुतेक स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असते. UPI अॅप्स आता पेमेंट ऑथेंटिकेट करण्यासाठी या सुरक्षा प्रणालीचा वापर करतील. तुम्ही अॅपच्या सेटिंग्जमध्ये फिंगरप्रिंट पेमेंट फीचर चालू केले असेल, तर पेमेंट करताना तुम्हाला पिन टाकण्याची आवश्यकता नाही. पेमेंट फक्त तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीद्वारे कन्फर्म केले जातील.
HDFC Bankने केले मोठे 4 बदल! थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम, अवश्य वाचा
हा बदल का आवश्यक मानला जातो?
UPI च्या वाढत्या वापरामुळे, UPI फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. कधीकधी, लोक पिन पाहून किंवा विचारून फसवणूक करतात. बऱ्याचदा, गर्दीच्या ठिकाणी, UPI पिन टाकताना, जवळचे लोक स्क्रीनकडे पाहून पिन पाहू शकतात, ही घटना 'शोल्डर सर्फिंग' म्हणून ओळखली जाते. बायोमेट्रिक पेमेंट सुरू केल्याने हा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाय, चुकीचा पिन टाकल्यामुळे किंवा पिन विसरल्यामुळे फेल ट्रांझेक्शनची समस्या देखील कमी होईल.
तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक
खरंतर हे फीचर खुप सुविधाजनक आहे. मात्र एक्सपर्ट मानतता की, फोनची सुरक्षा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. फोन दुसऱ्या कोणाच्या हातात गेला तर बायोमेट्रिक पेमेंटचा चुकीचा वापरही शक्य आहे.
PhonePe मधये कसे अॅक्टिव्ह करावे बायोमेट्रिक पेमेंट?
- PhonePe अॅप ओपन करा.
- Profile मध्ये जा.
- Manage Payments वर टॅप करा.
- Biometric Pay आयकॉन निवडा.
- संबंधित अकाउंटसाठी Biometric Authentication ऑन करा.
- एकदा यूपीआय पिन आणि बायोमेट्रिकने कंफर्म करा.
