UPI ची वाढती लोकप्रियता पाहून आता क्रेडिट कार्ड यूझर देखील खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा ऑप्शन निवडत आहेत. UPI पेमेंट दरम्यान क्रेडिट कार्ड वापरणे खूप सोपे आहे. UPI पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड कसे वापरायचे ते पाहू. यासाठी प्रथम क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करा.
लिंक कसे करावे
प्रथम UPI ॲप डाउनलोड करा. जर तुम्ही पहिल्यांदा UPI वापरत असाल, तर क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) इंस्टॉल करणे बेस्ट होईल. आता ॲप उघडा आणि ‘add payment method' सेक्शनमध्ये जा. क्रेडिट कार्ड ऑप्शन निवडा आणि तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक, CVV आणि एक्सपायरी डेट टाका. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
advertisement
लेकीच्या नावाने 5 हजारांची SIP करावी की SSY मध्ये गुंतवणूक करावी? जाणून घ्या कुठे जास्त फायदा
क्रेडिट कार्ड अकाउंट लिंक केल्यानंतर, आता तुमच्या क्रेडिट कार्डवरून UPI आयडी तयार करा. तुमच्या बँक अकाउंटशी लिंक केलेल्या या आयडीसह, तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकता किंवा रिसिव्ह करू शकता. तुमचा UPI आयडी तपासण्यासाठी ॲपमधील प्रोफाइल सेक्शनमध्ये जा आणि UPI आयडी सिलेक्ट करा.
Pan card Update: पॅनकार्ड नसेल तरी कोणती 10 कामं होऊ शकतात?
UPI द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट कसे करावे
क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करण्यासाठी, प्रथम QR कोड स्कॅन करा किंवा 'पे फोन नंबर' किंवा 'पे कॉन्टॅक्ट्स' ऑप्शन निवडा आणि तुमचा UPI आयडी निवडा किंवा ॲपवरील संबंधित पेमेंट ऑप्शनवर जा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही 'सेल्फ ट्रान्सफर'चा ऑप्शन देखील निवडू शकता, ज्याद्वारे तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकाल. ॲपचा QR कोड आणि फोन नंबर व्हेरिफाय केल्यानंतर, ट्रान्सफर करायची रक्कम टाका आणि पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड ऑप्शन निवडा. आता पिन टाकल्यानंतरच तुमचे पेमेंट सक्सेसफुल होईल.