TRENDING:

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? अमेरिका-इराणमध्ये सीझफायरचा मोठा निर्णय; कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

Last Updated:

अमेरिका इराणने १५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शवली, होर्मुज समुद्री मार्ग उघडण्याची शक्यता, ब्रेंट क्रूड ९२ डॉलरवर, तेल दरात मोठी घसरण

advertisement
अमेरिका विरुद्ध इराण युद्धविराम केल्याचं जाहीर केल्यानंतर इराणनेही प्रस्ताव स्वीकारला आहे. 15 दिवसांसाठी म्हणजे दोन आठवडे युद्धविराम असेल. या घोषणेनंतर जगभरात एक मोठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली आहे. या करारामुळे जगाचा श्वास रोखणारा स्ट्रॅट ऑफ होर्मुज हा समुद्री मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

ब्रेंट क्रूडमध्ये १६ टक्क्यांची घसरण

सलग अनेक दिवस शंभरी पार गेलेल्या कच्च्या तेलाचा दर आता १०० डॉलरच्या खाली आला आहे. युद्धविरामाच्या बातमीने जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ब्रेंट क्रूडचे दर तब्बल १६ टक्क्यांनी घसरून ९२ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तर अमेरिकन क्रूड मध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली असून तो ९५ डॉलरवर स्थिरावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की, "हा युद्धविराम पूर्णपणे इराण 'होर्मुज' मार्ग कसा आणि किती लवकर उघडतो, यावर अवलंबून असेल."

advertisement

युद्धविरामासाठी पाकिस्तानकडून मध्यस्ती

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने मांडलेला युद्धविरामाचा प्रस्ताव दोन्ही देशांनी मान्य केला आहे. या अंतर्गत पुढील दोन आठवडे समुद्री मार्ग सुरक्षित ठेवला जाईल. विशेष म्हणजे, या प्रस्तावाला इस्रायलनेही संमती दिली आहे, ज्यामुळे जागतिक बाजाराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

होर्मुज मार्ग का महत्त्वाचा?

जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी २०% पुरवठा हा एकट्या 'स्ट्रॅट ऑफ होर्मुज' मधून होतो. इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे ऊर्जा बाजारात हाहाकार माजला होता. आता हा मार्ग मोकळा झाल्याने पुरवठा साखळी पुन्हा रुळावर येण्याची आशा आहे.

advertisement

भाव जरी घसरले तरी रिस्क कायम!

तेलाचे दर कमी झाले असले तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाही. कमोडिटी एक्सपर्ट रॉबर्ट रेनी यांच्या मते, "पुरवठा लगेच सामान्य होणार नाही. बंद पडलेले तेल विहिरी सुरू करणे आणि जहाजांची पुन्हा तैनाती करणे यासाठी किमान काही महिन्यांचा काळ लागू शकतो." त्यामुळे बाजारात अजूनही काही प्रमाणात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? अमेरिका-इराणमध्ये सीझफायरचा मोठा निर्णय; कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल