TRENDING:

Gold And Silver: रिस्क-ऑफ मोड ऑन! सोन्याला लागणार आग, दर ऐकून चक्कर येईल; चांदीचा 'महाविस्फोट' फिक्स

Last Updated:

Gold And Silver Prices: इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. वाढत्या तणावाचा थेट परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर दिसून येत आहे.

advertisement
मुंबई: इराण आणि इस्रायलदरम्यान सुरू झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर जागतिक बाजारपेठेत भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर जात सुरक्षित पर्यायांकडे म्हणजेच सोने आणि चांदीकडे वळत आहेत. याचा थेट परिणाम कमोडिटी आणि शेअर बाजारावर दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार कायम राहू शकतो. ज्यामुळे मौल्यवान धातूंना आधार मिळू शकतो.
News18
News18
advertisement

28 फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केल्याचे वृत्त आहे. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र हल्ले केले. या घडामोडींमुळे जागतिक बाजारात ‘रिस्क-ऑफ’ भावना पसरली आहे. गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून सोने, चांदी आणि यूएस ट्रेझरीसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळत आहेत.

advertisement

दिल्ली सराफा बाजारातही सोन्याच्या दरात जोरदार वाढ नोंदवली गेली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार शुक्रवारी सोन्याचा दर 1,800 रुपयांनी वाढून 10 ग्रॅममागे 1,64,700 रुपयांवर पोहोचला. आठवड्याच्या शेवटी भौतिक बाजारात मागणी वाढल्याने 24 कॅरेट सोने 10 ग्रॅममागे सुमारे 1,75,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चांदीचा दरही 1 किलोमागे 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजार अधिकृतरीत्या बंद असतानाही स्थानिक पातळीवर वाढलेली खरेदी दर्शवते की गुंतवणूकदार युद्धाच्या जोखमीपासून बचावासाठी बुलियनमध्ये गुंतवणूक करत आहेत.

advertisement

सोमवारचे चित्र कसे असेल?

तज्ज्ञांच्या मते भूराजकीय तणाव वाढल्यावर गुंतवणूकदार सहसा शेअर बाजारातून निधी काढून सोने, चांदी आणि सरकारी रोख्यांसारख्या सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला तर सोने-चांदीच्या किमतींमध्ये आणखी तेजी येऊ शकते.

सोमवार 2 मार्च रोजी सोने-चांदीच्या दरांची दिशा मुख्यतः तीन घटकांवर अवलंबून असेल एक मध्यपूर्वेतून येणाऱ्या युद्धासंबंधी घडामोडी, दुसरे अमेरिकन डॉलरची हालचाल आणि तिसरे म्हणजे बाँड यिल्डचा कल होय. तणाव वाढल्यास दरांमध्ये आणखी उसळी येऊ शकते; मात्र कूटनीतिक तोडगा निघाल्याच्या बातम्या आल्यास तेजी मर्यादित राहू शकते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold And Silver: रिस्क-ऑफ मोड ऑन! सोन्याला लागणार आग, दर ऐकून चक्कर येईल; चांदीचा 'महाविस्फोट' फिक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल