TRENDING:

Pan Card : व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅनकार्डचं काय होतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Last Updated:

पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया आणि कारणे जाणून घ्या. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास दंड होऊ शकतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सरेंडर करता येते.

advertisement
भारतीय नागरिकासाठी पॅन कार्ड, आधारकार्डही अत्यंत महत्त्वाची सरकारी कार्ड आहेत. जी त्याची ओळख म्हणून तसंच आर्थिक व्यवहारातील पात्रता म्हणून वापरली जातात. पॅन कार्ड हे असंच अत्यंत महत्त्वाचं कार्ड आहे. आर्थिक व्यवहार करताना अनेकदा मोठ्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड नंबर द्यावा लागतो. पण कधीकधी हे पॅन कार्ड सरकारला परत करावं लागतं. हे कार्ड सरेंडर करण्याचे नियम आणि प्रक्रिया जाणून घेऊया. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पॅन कार्ड
पॅन कार्ड
advertisement

आधारप्रमाणेच पॅन कार्डही एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. बँक खाते उघडण्यापासून ते इन्कम टॅक्स भरण्यापर्यंत याची आवश्यकता असते. पण जर पॅन कार्डमध्ये काही चूक झाली किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर तुम्ही काय कराल? अशावेळी तुम्ही पॅन कार्ड सरेंडर करू शकता.जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत पॅन कार्ड सरेंडर करावे लागेल आणि ते सरेंडर कसं करायचं.

advertisement

पॅन कार्ड कधी सरेंडर करावं लागतं?

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील. तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल. तुमचे पॅन कार्ड आयकर विभागाने निष्क्रिय केलं असेल. तुमचे कार्डवरची माहिती चुकीची असेल. तुमचे पॅन कार्ड एखाद्या कंपनीचे किंवा फर्मच्या नावाने असेल आणि ती कंपनी किंवा फर्म बंद केली तर पॅन कार्ड सरेंडर करावं लागू शकतं. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं पॅन कार्ड सरेंडर करतात. जर तुम्ही कायमचे भारताबाहेर रहायला गेलात तर पॅन कार्ड सरेंडर करायला लागतं.

advertisement

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर तुम्ही त्यातील एक कार्ड वेळेत सरेंडर करायला हवं कारण इन्कम टॅक्स विभागाला माहिती मिळाली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. इन्कम टॅक्स विभागाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅनकार्ड असतील तर त्याला 10,000 रुपये दंड भरावा लागू शकतो किंवा किमान 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. एखाद्या केसमध्ये शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतं.

advertisement

कसं कराल सरेंडर?

तुम्ही पॅन कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सरेंडर करू शकता. ऑनलाइन सरेंडर करण्यासाठी एनएसडीएलच्या वेबसाइटवर जा. त्यानंतर, अॅप्लिकेशन टाइप ड्रॉप-डाउनमधून, विद्यमान पॅन डेटा / पॅन कार्डचे पुनर्मुद्रण (विद्यमान पॅन डेटामध्ये कोणताही बदल नाही) पर्यायात बदल किंवा दुरुस्ती निवडा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट रजिस्टर होईल. यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर एक टोकन नंबर पाठवला जाईल.

advertisement

टोकन नंबर लिहून घ्या आणि खाली दिलेल्या कंटिन्यु विथ पॅन अॅप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून प्रक्रिया सुरू ठेवा. आता एक नवीन वेबपेज ओपन होईल.

ई-साइनद्वारे स्कॅन केलेले फोटो सबमिट करण्याचा पर्याय निवडा. पेजच्या खालच्या डाव्या बाजूला तुमच्याकडे ठेवायच्या पॅनकार्डचा तपशील भरावा लागेल. मागितलेली माहिती भरा, त्यानंतर नेक्स्टचा पर्याय निवडा. यानंतर विनंती केलेली कागदपत्रं जसं की फोटो, स्वाक्षरी, पत्ता, ओळखपत्र इत्यादी अपलोड करा. आवश्यक तेथे पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करण्याची पावती दिसेल. ते डाउनलोड करा आणि सुरक्षित ठेवा.

आता पावतीची प्रत दोन फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह एनएसडीएल कार्यालयाला पोस्टाने पाठवा. पावती पाठवण्यापूर्वी पाकिटावर पॅन रद्द करण्यासाठी अर्ज आणि पावती क्रमांक हे आठवणीने लिहा. पॅनकार्डधारकाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबीयांना किंवा नातेवाईकांना संबंधित क्षेत्रातील आयकर अधिकाऱ्याला पत्र लिहावं लागेल, ज्यामध्ये पॅनकार्ड सरेंडर (धारकाचा मृत्यू) आणि मृत्यु दाखला असावा. याशिवाय नाव, पॅनकार्ड क्रमांक, जन्मतारीख आदी आवश्यक माहिती द्यावी लागेल.

जर तुम्ही भारत सोडून दुसऱ्या देशात शिफ्ट झाला असाल, पॅन कार्डमध्ये चुकीची माहिती असेल, पॅनकार्ड हरवलं असेल किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या परिसरातील जवळच्या आयकर अधिकाऱ्याला भेटून ते रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे अर्ज करू शकता. अर्जात पॅनकार्ड सरेंडर करण्याचं कारण सांगावं लागेल, तसेच आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतील.

मराठी बातम्या/मनी/
Pan Card : व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅनकार्डचं काय होतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल