TRENDING:

नवीन वर्षात घर खरेदीसाठी आयुष्यभराची कमाई लावाल पण या चुका केल्यास सगळंच गमावणार!

Last Updated:

Property Rules :  स्वतःचे घर असावे, हे स्वप्न जवळपास प्रत्येकाच्या मनात असते. विशेषतः नोकरी करणाऱ्या पगारदार वर्गासाठी घर खरेदी हा आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय मानला जातो.

advertisement
Property Rules
Property Rules
advertisement

मुंबई : स्वतःचे घर असावे, हे स्वप्न जवळपास प्रत्येकाच्या मनात असते. विशेषतः नोकरी करणाऱ्या पगारदार वर्गासाठी घर खरेदी हा आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय मानला जातो. वर्षानुवर्षे केलेली बचत, कर्जाची बांधिलकी आणि भविष्यातील जबाबदाऱ्या लक्षात घेऊनच हा निर्णय घ्यावा लागतो. अनेकजण भावनिक भरात किंवा समाजाच्या दबावाखाली घर खरेदी करतात; मात्र तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळ आणि आर्थिक स्थैर्य नसताना घेतलेला निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतो.

advertisement

काय काळजी घ्यावी?

घर खरेदी करताना बहुतांश वेळा गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. साधारणपणे बँका किंवा वित्तसंस्था घराच्या किमतीपैकी सुमारे 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात, तर उर्वरित 20 टक्के रक्कम खरेदीदाराला डाउन पेमेंट म्हणून स्वतःच्या खिशातून भरावी लागते. त्यामुळे नोकरीच्या सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध बचत करणे अत्यंत आवश्यक ठरते. भविष्यात घर घ्यायचे असेल, तर अचानक निर्णय न घेता किमान काही वर्षांची आर्थिक तयारी असावी, असा सल्ला दिला जातो.

advertisement

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रत्येक टप्प्यावर घर खरेदी करणे योग्य ठरत नाही. पगारदार व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही परिस्थिती असतात, ज्या वेळी घर खरेदीचा निर्णय पुढे ढकलणेच हिताचे ठरते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीवर आधीच वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे मोठे थकबाकी असेल, तर अशा वेळी गृहकर्जाचा अतिरिक्त बोजा उचलणे धोकादायक ठरू शकते. आधी असलेली कर्जे कमी करून आर्थिक स्थैर्य मिळवणे अधिक महत्त्वाचे असते.

advertisement

तसेच, केवळ आवड म्हणून किंवा ‘स्वप्नातील घर’ मिळतेय म्हणून आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीचे घर घेणे टाळावे. मोठ्या कर्जहप्त्यांमुळे मासिक बजेट कोलमडू शकते आणि दैनंदिन खर्च, बचत तसेच भविष्यातील गरजा पूर्ण करणे कठीण होऊ शकते. नियमित बचत नसेल, आपत्कालीन निधी तयार नसेल, तर घर खरेदीचा निर्णय घाईचा ठरू शकतो.

advertisement

घर खरेदी करताना अनेक जण फक्त घराच्या किमतीकडे लक्ष देतात; मात्र प्रत्यक्षात खर्च तिथेच थांबत नाही. नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, इंटिरियर काम, फर्निचर, घर बदलताना होणारा शिफ्टिंग खर्च यासाठीही मोठी रक्कम खर्चावी लागते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करूनच आर्थिक आराखडा तयार करणे गरजेचे आहे. जर शिफ्टिंग किंवा सजावटीचा खर्च परवडणारा नसेल, तर आधी त्यासाठी स्वतंत्र बचत करणे योग्य ठरते.

घर खरेदीसाठी किती पैसे लागतील, हा प्रश्न अनेक घटकांवर अवलंबून असतो. घराचे स्थान, परिसर, शहर आणि घराचा आकार यानुसार किंमतीत मोठा फरक पडतो. उदाहरणार्थ, मुंबई आणि परिसरात साधारण १ बीएचके घरासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येऊ शकतो, तर त्याच ठिकाणी मोठ्या आकाराच्या ३ ते 5 बीएचके घरांसाठी दोन ते चार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मोजावी लागू शकते. याउलट, इतर शहरांमध्ये किंवा उपनगरांमध्ये तुलनेने कमी बजेटमध्ये घर मिळू शकते.

मराठी बातम्या/मनी/
नवीन वर्षात घर खरेदीसाठी आयुष्यभराची कमाई लावाल पण या चुका केल्यास सगळंच गमावणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल