व्याजदर चेक करा
तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा कोणत्याही स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर मिळणाऱ्या व्याज आणि इतर फायद्यांची तुलना नक्कीच करा. सामान्यतः, फिक्स्ड जिपॉझिटमध्ये गुंतवणूक (FD) दरवर्षी 6.7 टक्के ते 7 टक्के व्याजदर देते. त्याच वेळी, 5 वर्षांची कर बचत करणारी एफडी थोडी जास्त व्याज देते. दुसरीकडे, जर आपण लहान बचत योजनांकडे पाहिले तर पीपीएफ सध्या वार्षिक 7.10% दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.20% दराने व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी खात्यावर 8.20% दराने व्याज मिळत आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.7 टक्के आणि किसान विकास पत्रावर 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे.
advertisement
SBI की Post Office, FD वर सर्वाधिक व्याज कोण देतंय? लगेच करा चेक
टॅक्स सेव्हिंगकडे लक्ष द्या
तुम्ही कमी टॅक्स ब्रॅकेटमध्ये किंवा शून्य टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करा किंवा स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक करा. याने फारसा फरक पडत नाही. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्हाला जास्त रिटर्न कुठे मिळेल. म्हणजेच, जिथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळेल तिथे गुंतवणूक करा. अशा प्रकारे तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतील. याशिवाय, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला पैशांची कधी गरज पडेल. जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बराच काळ वाट पहावी लागेल. म्हणून, तुमची आर्थिक उद्दिष्टे, रिटर्न आणि तुमच्या गरजा लक्षात घेऊन कोणतेही गुंतवणूक प्रोडक्ट निवडा.