आरबीआय एफएक्यूमधील प्रश्न
प्रश्न: मी व्यापारी आहे, तसेच मी इतर बँक खात्याशी लिंक केलेले (पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत नाही) पेटीएम क्यूआर कोड, पेटीएम साऊंडबॉक्स किंवा पेटीएम पीओएस टर्मिनलचा वापर करत पेमेंट्स स्वीकारतो. मी 15 मार्च 2025 नंतर देखील हे सेट-अप वापरणे सुरू ठेवू शकतो?
उत्तर : होय. तुमची पावती आणि निधीचे हस्तांतरण पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँक खात्याशी जोडलेले असल्यास तुम्ही 15 मार्च 2024 नंतर देखील ही व्यवस्था वापरणे सुरू ठेवू शकता.
advertisement
पूर्वीप्रमाणेच व्यापारी सेटलमेंट सुरू ठेवण्यासाठी कंपनीने आपले नोडल खाते अॅक्सिस बँकेत (एस्क्रो खाते उघडून) हस्तांतरित केले आहे. या व्यवस्थेमुळे ओसीएल पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत वापरत असलेले नोडल खाते एकसंधीपणे बदलणे अपेक्षित आहे. ओसीएलची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्विसेस लि. (पीपीएसएल) तिच्या स्थापनेपासूनच अॅक्सिस बँकेच्या सेवा वापरत आहे.
पेटीएम प्रवक्ते म्हणाले, ''आम्ही अनुपालन व नियामक मार्गदर्शकतत्त्वांवर लक्ष केंद्रित करत आमच्या व्यापारी सहयोगींना विनासायास सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना आश्वासन देतो की, पेटीएम अॅप आणि आमचे अग्रणी डिवाईसेस जसे पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स, कार्ड मशिन नेहमीप्रमाणे पुढे देखील कार्यरत राहतील. नोडल खाते अॅक्सिस बँकेत (एस्क्रो खाते उघडून) हस्तांतरित करण्यामधून पूर्वीप्रमाणे मर्चंट सेटलमेंट सुरू राहण्याची खात्री मिळेल. आम्ही देशाच्या आर्थिक समावेशन प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देणा-या भारतींयाना सक्षम करत राहण्याचा प्रयत्न करतो.''
प्रश्न : पेटीएम फास्ट टॅग सुरू राहणार का?
उत्तर : ग्राहक फास्ट टॅगमध्ये बॅलन्स असेपर्यंत टोल भरण्यासाठी याचा वापर करू शकतात. 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या FASTags मध्ये पुढील निधी किंवा टॉप-अप्सना अनुमती दिली जाणार नाही. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी 15 मार्च 2024 पूर्वी दुसऱ्या बँकेने जारी केलेला नवीन FASTag खरेदी करावेत.
आरबीआयने शुक्रवारी पेटीएम संबंधी काही निर्बंधांची मुदत 15 दिवसांनी वाढवून 15 मार्च 2024 पर्यंत केली. ही मुदत आधी 29 फेब्रुवारी होती. टॉप-अप्स आणि फंड ट्रान्सफर सारख्या सेवांसाठी मुदत वाढवण्यात आली आहे, तर उर्वरित पेटीएम सेवा 29 फेब्रुवारीलाच बंद होणार आहेत.
हायवेवरून प्रवास करणाऱ्यांना पेटीएम पेमेंट्स बँक वगळता 32 अधिकृत बँकांकडून FASTags खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
