TRENDING:

आठवडाभर मुलांपासून राहिली, भाड्याच्या घरात राहून घेतली ट्रेनिंग, आज घरबसल्या महिला करतेय चांगली कमाई

Last Updated:

लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, एके दिवशी घरी बसले होते. त्यावेळी आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटले. त्यांच्या पतीने त्यांना मदतीसाठी आपल्या दुकानात बोलावले होते.

advertisement
मुकुल सतीजा, प्रतिनिधी
सपना बब्बर
सपना बब्बर
advertisement

करनाल : आजच्या काळात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी पद्धतीने व्यवसाय करत आहेत. आज अशाच एका यशस्वी महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. या महिलेनी आठवडाभर आपल्या मुलांपासून दूर राहून, भाड्याने राहत केक बनवणे शिकले. आज ही महिला आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत.

सपना बब्बर असे या महिलेचे नाव आहे. मागील 2 वर्षांपासून त्या होम बेकरी चालवत आहेत. त्यांच्या या बेकरीचे नाव Just Bite’s असे आहे. सपना यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात घरुनच केली होती. त्या शुगर फ्री, डिजाइनर, ड्राय केक आणि इतर अनेक प्रकारचे केक बनवतात.

advertisement

लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, एके दिवशी घरी बसले होते. त्यावेळी आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटले. त्यांच्या पतीने त्यांना मदतीसाठी आपल्या दुकानात बोलावले होते. मात्र, सपना यांना स्वतःचे काम सुरू करायचे होते. त्यामुळे सपना यांनी 2-3 दिवसांनी केक बनवण्याबाबत विचार केला. त्यांना केकची माहिती नव्हती. मात्र, तरीही त्या खचल्या नाहीत.

advertisement

photos : लिव्हरला करते मजबूत, पाइल्सवरही रामबाण उपाय, शरीरासाठी या फळाचे खूपच फायदे

एक दिवशी त्यांना माहिती झाले की, पंजाबमध्ये एका ठिकाणी केक कसे बनवले जातात, याबाबत शिकवले जाते. त्यामुळे सपना यांनी आपल्या 2 लहान मुलांना आपल्या आईच्या घरी ठेवले आणि त्या केक बनवण्याच्या ट्रेनिंगसाठी निघून गेल्या. त्याठिकाणी 1 आठवडाभर भाड्याच्या घरात राहिल्या आणि त्यांनी केक बनवण्याची ट्रेनिंग घेतली. आता त्यांचा अनुभव वाढला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या केकचा फोटो दाखवून केक तयार करता येतो.

advertisement

सुरुवातीला केला संकटांचा सामना -

सपना यांनी सांगितले की, जेव्हा त्या ट्रेनिंग करुन घरी करनाल याठिकाणी परतल्या आणि त्यांनी पहिल्यांदा केक बनवला तेव्हा केक अजिबात चांगला बनला नाही. मात्र, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आणि त्यांची हिंमत वाढली. आज त्या बाजारातील कोणत्याही प्रकारचा केक आपल्या घरीच बनवून घेतात. तसेच इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत केक पोहोचवत आहेत. त्यांना आता शेफ बनायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
आठवडाभर मुलांपासून राहिली, भाड्याच्या घरात राहून घेतली ट्रेनिंग, आज घरबसल्या महिला करतेय चांगली कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल